Gadar 2 सिनेमाने गाठला इतक्या कोटींचा गल्ला; ८ व्या दिवसाची कमाई हैराण करणारी

Gadar 2 | सनी देओल स्टारर 'गदर २' यंदाच्या वर्षातील सुपरहीट सिनेमा... आठ दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी...प्रेक्षकांची चित्रपटगृहात गर्दी... शनिवार - रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल?

Gadar 2 सिनेमाने गाठला इतक्या कोटींचा गल्ला; ८ व्या दिवसाची कमाई हैराण करणारी
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 8:16 AM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : ‘पठाण’, ‘द केरला स्टोरी’ या दोन सिनेमांतर अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने अनेक मोठ्या सिनेमांवर मात केली आहे. सनी देओल यांना पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमा प्रदर्शित होवून आठ दिवस झाले आहेत. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा अद्याप पडलेला नाही. आठ दिवसांची कमाई पाहता येत्या काही दिवसात सिनेमा ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र सनी देओल स्टारर ‘गदर २’ आणि कमाईची चर्चा रंगत आहे.

सनी देओलचे चाहते सिनेमाच्या कलेक्शनवर सतत लक्ष ठेवून आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी ‘गदर २’ सिनेमा अनेकवेळा सिनेमागृहात जावून पाहिला आहे. ‘गदर २’ची दमदार कमाई पाहून निर्माते आणि स्टारकास्टचा आनंद गगनाला भिडला आहे. एका आठवड्यात या सिनेमाने २८३ कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

दुसऱ्या आठड्याच्या शुक्रवारी सिनेमाने १९.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. भारतात सिनेमाने आतापर्यंत ३०४.१३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.आता शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन दिवसात सिनेमाला मोठा फायदा होईल… अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान चाहत्यांमध्ये सर्वत्र सनी देओल यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण ‘गदर २’ सिनेमामुळे अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमाला मोठ्या अडचणींचा सामना कराला लागत आहे. अक्षयच्या सिनेमाचं कौतुक होत आहे, तर प्रेक्षकांना सिनेमाची कथा आवडत आहे.

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा यंदाच्या वर्षातील दुसरा यशस्वी सिनेमा ठरला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सिनेमाने फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता ‘गदर २’ सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर २’ ने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २४२.२० कोटी रुपये कमावले होते. आता ‘गदर २’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.