Gadar 2 | रक्षाबंधनच्या ऑफरचा ‘गदर २’ सिनेमाला फायदा; एका दिवसात कमावले इतके कोटी
Gadar 2 | सनी देओल यांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला... तिकिटांवर Buy 2 Get 2 ऑफरचा मोठा फायदा, एका दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित प्रदर्शित झालेला ‘गदर २’ सिनेमा आजही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढावा म्हणून निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकिटांवर Buy 2 Get 2 ऑफर ठेवण्याची योजना आखली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा आणि सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे. सलग २१ दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे.
‘गदर २’ सिनेमाच्या २१ व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. ‘गदर २’ सिनेमा लवकरच ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. सिनेमातील तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. शिवाय सिनेमातील गाणी आणि डायलॉग देखील सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
सलग २१ दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ सिनेमाने २१ दिवशी तब्बल ७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत ४८१.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी सिनेमाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे सिनेमात्या निर्मात्यांनी Buy 2 Get 2 ऑफर प्रेक्षकांना दिली होती. ज्यामुळे सनी देओल यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. र्मात्यांनी जाहीर केलेली ऑफर २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत आहे. त्यामुळे ३ सप्टेंपर्यंत सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गदर 2’ सिनेमा यंदाच्या वर्षांतील सुपरहीट सिनेमांपैकी एक ठरला आहे. ‘पठाण’ आणि ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ‘गदर 2’ सिनेमाचं राज्य बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. तर ७ सप्टेंबर २०२३ ला ‘जवान’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. अशा ‘गदर २’ सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकेल का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गदर २’ सिनेमा २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल आहे. ‘गदर’ सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘गदर’ सिनेमात तारा सिंग पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. तर ‘गदर २’ सिनेमात तारा सिंग मुलाला आणण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचं दाखवण्यात आलं आहे.