‘यांना जराही लाज नाही’; राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत सनी देओलला हसताना पाहून भडकले नेटकरी
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार कोहली यांच्या निधनानंतर रविवारी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक कलाकार तिथे पोहोचले होते. मात्र अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल हसताना दिसून येत आहे.
मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | दिग्गज दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘नागिन’, ‘जानी दुश्मन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे. रविवारी कोहली यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेता सनी देओलचाही समावेश होता. मात्र प्रार्थना सभेतील एका व्हिडीओमुळे सनीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. या व्हिडीओमध्ये सनी देओल हसताना दिसून येत आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थना सभेला आल्यानंतर सनीच्या चेहऱ्यावर हसू का आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘हा अंत्यविधीला आला आहे की पार्टीला?’, असा संतप्त सवाल एका युजरने केला. तर ‘ज्या व्यक्तीच्या वडिलांचं निधन झालं आहे, त्यांच्यासमोर हसणं कितपत योग्य आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘प्रार्थना सभेतील सेलिब्रिटींचं असं वागणं पाहून खूप वाईट वाटतंय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘ही कोणत्या प्रकारची शोकसभा आहे’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
राजकुमार कोहली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सकाळी बऱ्याच वेळापर्यंत ते बाथरुममधून बाहेर आले नाहीत, म्हणून कुटुंबीयांना चिंता वाटू लागली होती. अखेर बाथरुमचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेले वडील बराच वेळ बाहेर न आल्याने मुलगा अरमान कोहलीने आवाज दिला. आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. अखेरचा पर्याय म्हणून अरमानने बाथरुमचा दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
राजकुमार कोहली यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘नागिन’, ‘जानी दुश्मन’, ‘बीवी नौकर का’, ‘बदले की आग’, ‘राज तिलक’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘इंतेकाम’, ‘बीस साल बाद’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यापैकी ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ हे त्यांचे सर्वाधिक हिट चित्रपट आहेत. राजकुमार यांनी 1962 मध्ये ‘सपनी’ या नावाचा चित्रपट बनवला होता. यामध्ये प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.