Gadar 2 | सनी देओल याला मोठा झटका, ‘गदर 2’ चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गदर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशीच मोठा धमाका केला आहे.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) चित्रपट धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सध्या बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त गदर 2 या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय. गदर 2 चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करण्यास नक्कीच सुरूवात केलीये. विशेष म्हणजे गदर हा चित्रपट (Movie) तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता ही बघायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सनी देओल हा देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला.
गदर 2 चित्रपटाने ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कामगिरी करत थेट 40 कोटींची कमाई केली. दुसरा दिवसही बाॅक्स आॅफिसवर गदर 2 चित्रपटानेच गाजवला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 42 कोटींच्या आसपास कलेक्शन केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाची कामगिरी वाढण्याचा अंदाज आहे.
गदर 2 चित्रपट धमाका करत असतानाच आता निर्मात्यांना धक्का देणारी बातमी पुढे येत आहे. गदर 2 चित्रपट यूट्यूबवर लीक झाल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर संपूर्ण चित्रपट लीक झाला आहे. यामुळे आता हा मोठा धक्काच चित्रपट निर्मात्यांना म्हणावा लागणार आहे. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार गदर 2 हा चित्रपट HTD 3 star boys नावाच्या चॅनलवर लीक करण्यात आल्याचे सांगितले आहे. आता चित्रपट निर्माते यावर काही अॅक्शन घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ही पहिलीच वेळ नाही की, रिलीज झालेला चित्रपट लीक झालाय. नेहमीच चित्रपट रिलीज झाल्यानंतर लीक होताना दिसत आहेत.
गदर 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये थिएटरबाहेर गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी दिसत होती. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला हे कळू शकले नाही.
बऱ्याच वर्षांनंतर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अशाप्रकारची गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. मुळात म्हणजे गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी आता हा चित्रपट रिलीज झालाय. रविवारी चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.