Katrina Kaif हिच्या होणाऱ्या जाऊबाईचं मोठं स्वप्न; माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन

Katreena Kaif | कतरिना कैफ हिची जाऊबाई तिच्यापेक्षाही सुंदर, तिचे वडील बिल्डर तर माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन... कतरिना हिची होणार जाऊबाई देखील झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध नाव... सध्या सर्वत्र कैफ आणि कौशल कुटुंबाची चर्चा... कोण आहे 'ती'?

Katrina Kaif हिच्या होणाऱ्या जाऊबाईचं मोठं स्वप्न;  माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 1:55 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री कतरिना कैफ ही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नात विकी – कतरिना यांचे कुटुंबिय आणि मित्र – परिवार उपस्थित होते. पण सर्वांचं लक्ष येवून थांबलं ते म्हणजे कतरिना कैफ हिची होणारी जाऊबाई आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यावर… विकी कौशल याचा लहान भाऊ सनी कौशल गेल्या अनेक वर्षांपासून शर्वरी वाघ हिला डेट करत आहे. ‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शर्वरी हिने तिच्या करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली.

माजी मुख्यमंत्र्यांसोबत शर्वरी वाघ हिचं खास कनेक्शन

शर्वरी वाघ हिचा जन्म १४ जून १९९६ मध्ये मुंबई याठिकाणी झाला. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर तिची आई नम्रता आणि बहिण कस्तुरी वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत. शिवाय राजकीय घराण्याशी देखील शर्वरी हिचं खास कनेक्शन आहे. सध्या सर्वत्र शर्वरी वाघ हिची चर्चा रंगली आहे.

शर्वरी वाघ हिच्या आजोबांबद्दल सांगायचं झालं तर, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची शर्वरी मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्याचं शर्वरी हिचं स्वप्न आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीचं आणखी एक सप्न आहे. एका मुलाखतीत शर्वरी हिने तिच्या मनातील इच्छा व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

शर्वरी वाघ हिला अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रिन शेअर करायची आहे. ‘रणवीर याने मेहनतीने, त्याच्या उत्साहीपणाने आणि कामाबद्दलच्या त्याच्या समर्पणाने बॉलिवूडमध्ये यश मिळवलं आहे. त्याचं काम पाहून मी कायम प्रभावित होत असते. रणवीर याला पाहिल्यानंतर रोज काहीतरी शिकायला मिळतं. पण रणवीर याच्यासोबत एकातरी सिनेमात काम करायचं आहे आणि माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यावर माझा विश्वास आहे.’ सध्या सर्वत्र शर्वरी वाघ हिची चर्चा.

शर्वरी फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शर्वरी हिने तिच्या करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. ‘प्यार का पंचनामा-2’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या सिनेमांमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

सोशल मीडियावर देखील शर्वरी वाघ कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, बॉयफ्रेंड सनी कौशल याच्यासोबत देखील शर्वरी हिला अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं.

राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.