Sunny Leone | वेदनेनं विव्हळत असताना सनी लिओनी ‘त्या’ महिलेला थेट म्हणाली “कानाखाली मारेन”

या व्हिडीओत सनी लिओनीच्या पायाला दुखापत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर वेदनेनं विव्हळत असताना सनी एका महिलेला कानाखाली मारणार असल्याचं म्हणते.

Sunny Leone | वेदनेनं विव्हळत असताना सनी लिओनी 'त्या' महिलेला थेट म्हणाली कानाखाली मारेन
Sunny LeoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 7:31 PM

मुंबई: अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या आगामी ‘कोटेशन गँग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनीच्या पायाला दुखापत झाली. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सनी लिओनीच्या पायाला दुखापत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर वेदनेनं विव्हळत असताना सनी एका महिलेला कानाखाली मारणार असल्याचं म्हणते.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सनी लिओनीचा पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं दिसतंय. त्यातून रक्तही येत असतं. हे पाहून तिची टीम तिच्याजवळ येते आणि दुखापतीवर उपचार करू पाहते. मात्र यादरम्यान सनी असंकाही ऐकते, ज्यामुळे तिच्या तोंडून ‘कानाखाली मारू का’ असे शब्द ऐकायला मिळतात. अंगठ्याला झालेल्या जखमेच्या वेदनेनं ती विव्हळत असते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, जेव्हा एक महिला इंजेक्शन देण्याचं बोलते तेव्हा सनी घाबरते आणि त्यामुळेच ती महिलेला कानाखाली मारू का असं म्हणते. मात्र थोड्या वेळानंतर ती शांत होऊन त्या महिलेचं ऐकू लागते आणि तिच्याकडून उपचारही करून घेते.

सनी आगामी ‘कोटेशन गँग’ या क्राइम-थ्रिलर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत जॅकी श्रॉफचीही भूमिका आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याची कथा गँगवॉरच्या अवतीभोवती फिरत असल्याचा अंदाज येतो. कोटेशन गँग हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मात्र तो हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.