Sunny Leone ने ट्विट केल्यानंतर अखेर कंपनीला आली जाग, अशी सुधारली चूक

अभिनेत्री सनी लिओनी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाला होता. तिच्यासोबत घडलेली घटना तिने सांगितली. ज्यानंतर कंपनीला जाग आली.

Sunny Leone ने ट्विट केल्यानंतर अखेर कंपनीला आली जाग, अशी सुधारली चूक
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 7:42 PM

मुंबई : LinkedIn ने सनी लिओनीचं अकाऊंट ब्लॉक केल्यामुळे जगभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, सनी लिओन अखेर लिंक्डइनवर परत आली आहे. तिने ट्विटरवर ही बातमी शेअर करत स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. सनी लिओनीचे लिंक्डइन खाते ब्लॉक करण्यात आले होते, कारण कंपनीला असे वाटले की अभिनेत्रीचे हे खाते बनावट आहे. पण सनीने ट्विटर केल्यानंतर लिंक्डइऩने तिचे अकाऊंट तिला पुन्हा बहाल केले आहे. (Sunny Leone Linkedin Account Restore )

सनी लिओनी ( Sunny Leone ) लिंक्डइनवर परत आल्यानंतर तिने ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर सनी लिओनी नेहमीच खूप सक्रिय असते. बॉलिवूडमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाने चांगली फॅनफॉलोईंग तयार केली आहे. एकेकाळी अडल्ट स्टार म्हणून ओळख असलेल्या सनी लिओनीला आता अभिनेत्री म्हणून ओळखतात.

व्हिडिओमध्ये सनी लिओनी ( SunnyLeone ) म्हणाली की, “लिंक्डइनवर एका महिन्यानंतर माझे अकाऊंट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना वाटले की ही वास्तविक सनी लिओनी नाही. परंतु लिंक्डइनने माझे वैयक्तिक अकाऊंट हटविण्याचे कारण नव्हते. हे खूप वाईट आहे, आणि मला आशा आहे की त्यांनी त्यांचा निर्णय बदलला असेल कारण त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी मला ईमेल पाठवला नाही किंवा मला कळवले नाही.”

Sunny Leone च्या वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती अनुराग कश्यपसह विक्रम भट्टचा अनामिका, पॉवर-पॅक्ड बहुभाषिक चित्रपट, शेरो आणि कोटेशन गँग सारखे प्रोजेक्टवर काम करत आहे. अर्जुन बिजलानीसोबत स्प्लिट्सविला 14 मध्ये ती शेवटची दिसली होती, 41 वर्षीय सनीने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना याआधीही हैराण केले. रिअ‍ॅलिटी शोद्वारे तिने मनोरंजन उद्योगात केवळ नाव कमावले नाही तर तिने स्वतःच्या बायोपिक ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ मध्ये देखील काम केले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.