Dhanush | सुपरस्टार धनुषची का होतेय बाबा रामदेव यांच्यासोबत तुलना? ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल थक्क

सुपरस्टार धनुष याचा व्हायरल होत असलेला 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल हैराण, अभिनेत्याची का होत आहे बाबा रामदेव यांच्यासोबत तुलना? सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

Dhanush | सुपरस्टार धनुषची का होतेय बाबा रामदेव यांच्यासोबत तुलना? 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल थक्क
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 1:55 PM

मुंबई | साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांबद्दल सांगायचं झालं तर सुपरस्टार धनुष याचं नाव कायम अव्वल स्थानी असले. सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत अभिनेता धनुष याने इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्ठान निर्माण केलं आहे. धनुष याने स्वतःला फक्त साऊथ सिनेसृष्टीपर्यंच मर्यादित न ठेवता बॉलिवूडमध्ये देखील उत्तम अभिनय करत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. धनुष याने ”रांझना” सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेता कायम त्याच्या सिनेमांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची तुलना चाहते बाबा रामदेव यांच्यासोबत करत आहेत. सध्या सर्वत्र धनुष याच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे.

नुकताच, धनुष याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. विमानतळावर नव्या लूकमध्ये दिसल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोल करण्यात येत आहे. धनुषचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र धनुषच्या व्हिडीओची आणि अभिनेत्याच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे..

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बाबा रामदेव यांचा मुलगा…’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बाबा रामदेव स्पॉटेड..’, ‘अण्णाचा चेहरा कुठे गेला..’ सांगायचं झालं तर, काही चाहत्यांना अभिनेत्याचा लूक आवडला आहे, तर काहींनी मात्र धनुषचा नवा लूक पाहून अभिनेत्याला ट्रोल केलं आहे..

धनुष फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसतो, तर अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात. धनुष केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. धनुषने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.38 वर्षीय धनुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत 2004 मध्ये त्याने लग्न केलं. या दोघांना दोन मुलंही आहेत. पण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.