Shahid Kapoor | ‘शाहीद कपूर याच्या आयुष्यात मला…’, मुलाबद्दल सुप्रिया पाठक यांचं खळबळजनक वक्तव्य
Shahid Kapoor | आईसोबत कसं आहे शाहीद कपूर याचं नात? सुप्रिया पाठक यांच्या वक्तव्यनंतर सर्वत्र खळबळ... शाहिद आणि मीरा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सुप्रिया पाठक स्पष्टच बोलल्या.. सध्या सर्वत्र सुप्रिया पाठक यांच्या वक्तव्याची चर्चा.. काय आहे सत्य?
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहीद कपूर फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत अशते. शाहीद कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देत असतो. पत्नी मीरा राजपूत आणि मुलांसोबत शाहीद कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. दरम्यान, अभिनेत्याचं कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नातं कसं आहे. याची देखील चर्चा कायम रंगलेली असते. नुकताच झालेल्या मुलाखतीत शाहीद कपूर याच्या आई आणि अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी लेकासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र शाहीद कपूर आणि आई सुप्रिया पाठक यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे…
मुलाखतीत सुप्रिया पाठक यांना, ‘शुटिंग दरम्यान मीशा कपूर आणि झैन कपूर यांच्यासोबत कसा वेळ व्यतीत करतात…’ असा प्रश्न विचारण्यात आला, यावर सुप्रिया पाठक म्हणाल्या, ‘माझ्याकडे खूप वेळ असतो. मी व्यस्त नसते.. महत्त्वाचं म्हणजे मी सतत काम करत नाही…जी भूमिका साकारून मला आनंद आणि समाधान मिळेल अशाच भूमिका मी साकारते…’
खासगी आयुष्याबद्दल देखील सुप्रिया पाठक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला असं वाटतं माझं कुटुंब आता मोठं झालं आहे. मुलं देखील त्यांच्या सांभाळ आता स्वतःकरू शकतात. त्याचं आता स्वतःचं कुटुंब आहे. पत्नी, मुलं आहेत. त्यांचा सांभाळ करण्यात आता ते व्यस्त झाले आहेत. त्यांमुळे त्यांच्या आयुष्यात मला महत्त्वाचं स्थान नाही..’ असं देखील सुप्रिया पाठक म्हणाल्या..
सुप्रिया पाठक म्हणाल्या, ‘मी आणि पंकज कपूर (शाहीद कपूर याचे वडील) यांच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करते. एकमेकांसोबत वेळ व्यतीत करायला आम्हाला आवडतं. ‘ सध्या सर्वत्र सुप्रिया पाठक यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सुप्रिया पाठक यांचे सिनेमे
सुप्रिया पाठक यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता त्या लवकचर ‘गँगस्टर गंगू’ लघूचित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाची कथा नातू आणि आजीच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे.
‘गँगस्टर गंगू’ लघूचित्रपटाबद्दल सुप्रिया पाठक म्हणतात, ‘सिनेमाची कथा नातू आणि आजीच्या नात्या भोवती फिरत आहे. लहानपणी मुलाचे आजी-आजोबांसोबतचे नातं खूप वेगळं असतं आणि कालांतराने नात्यात बरेच बदल होतात.’ ‘गँगस्टर गंगू’ लघूचित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.