गुलीगत सुरज चव्हाण आणि गौतमी पाटीलची झापूक झुपूक भेट; दोघांच्या गप्पांची मिसळ चांगलीच रंगली, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 19, 2024 | 4:26 PM

सुरज चव्हाण आणि गौतमी पाटीलच्या भेटीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं झाला आहे. दोघांच्या गप्पांची मिसळ चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. गौतमी आणि सुरजचा मनसोक्त गप्पा अन् खळखळून हसण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. व्हिडीओ शेअर करत गौतमीने भन्नाट कॅप्शनही दिलं आहे.

गुलीगत सुरज चव्हाण आणि गौतमी पाटीलची झापूक झुपूक भेट; दोघांच्या गप्पांची मिसळ चांगलीच रंगली, व्हिडीओ व्हायरल
Suraj Chavan Meet Gautami Patil.
Follow us on

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व प्रचंड गाजले. सगळेच स्पर्धक अगदी एकापेक्षा एक होते. पण त्यांच्यातही सगळ्यात जास्त प्रेम मिळालं ते गुलीगत स्टाईलच्या सुरज चव्हाणला.सुरजचे डायलॉग, त्याची जीव ओतून खेळण्याची पद्धत, मुख्य म्हणजे त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे तो अजून प्रसिद्धी झोतात आला. सुरजचे झापूक झुपूक, बुक्कीत टेंगूळ, पिल्लू-बच्चा असे बरेच डायलॉग चाहत्यांनी डोक्यावर घेतले. बिग बॉसच्या सेटवर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी अगदी अक्षय कुमारपासून ते सुबोद भावेपर्यंत, तर रितेश देशमुख यांनीसुद्धा सुरजचे डायलॉग त्याच्या स्टाईलने केले. त्यामुळे सुरजची क्रेझ वाढली होती यात शंका नाही. चाहत्यांच्या याच प्रेमाने त्याला बिग बॉस मराठी ५ चा विजेता बनवलं. सुरजनं विजेतेपद मिळवल्यानंतर मनोरंजनसृष्टीपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. पण आता त्याने महाराष्ट्रातली लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुरजच्या व्हिडीओवर गौतमीने लावले ‘हम तो ऐसे हे भैय्या’ गाणे

सुरज चव्हाणसोबत झालेल्या भेटीचा व्हिडिओ गौतमीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. गौतमी पाटीलने हा व्हिडीओ पोस्ट करत ‘बिग बॉस विजेता सुरज चव्हाण’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सोबतचं त्यांच्या व्हिडीओवर ‘हम तो ऐसे है भैय्या’ असं गाणं देखील लावलं आहे. गौतमीने हे गाणे खास सुरजसाठीच लावलं असल्याचं दिसून येतं आहे. व्हिडीओमध्ये सुरज आणि गौतमी एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारताना आणि खळखळून हसताना दिसत आहेत.

 

बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सुरजचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. तो अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये सुरज चव्हाण यांने हजेरी लावली होती आणि याच कार्यक्रमादरम्यान त्याची गौतमीसोबत भेट झाली. त्यांचा भेटीचा हा व्हिडीओ व्हायरलं झाला. व्हिडीओमध्ये गौतमी त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सुरज हाताची घडी घालून तो गौतमीसोबत गप्पा मारतोय, तिच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसतोय. याच गोष्टीमुळे सुरजचा बिग बॉसच्या घरात दिसलेला साधेपणा आणि मुलींप्रती असलेला आदर या व्हिडीओमध्येही दिसून आल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे. चाहत्यांनी सुरजच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. सुरज आणि गौतमीच्या भेटीचा हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे.

सुरज आणि गौतमीसाठी चाहत्यांची तुडूंब गर्दी

एकाच कार्यक्रमात गुलीगत आणि सबसे कातील गौतमी असल्यावर चर्चा आणि गर्दी तर होणारचं ना. गौतमी पाटील आणि सुरच यांचा चहातावर्ग खूप मोठा आहे. सुरज आणि गौतमी या दोघांचे मोठ्या पडद्यावरील नवीन काम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठी चित्रपट लाईक आणि सब्सक्राईब या सिनेमातील गौतमी पाटीलचं ‘लिंबू फिरवलं’ हे गाणं बरंच गाजतंय. या गाण्यात अभिनेता अमेय वाघसोबत गौतीमी थिरकताना दिसतेय.

सोशल मीडियावरही या गाण्याची बरीच चर्चा सुरु आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. तर, सुरजचं ‘राजा-राणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकही गौतमी आणि सुरजचं मोठ्या पडद्यावरील हे काम पाहायला उत्सुक आहे. या दोघांच्याही कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवरून हे दिसून येतं की यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे.