विवेक-ऐश्वर्याच्या वादानंतर सलमान खानसोबत कसं आहे नातं? सुरेश ओबेरॉय म्हणतात..

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | बॉलिवूडमधील काही नाती संपुष्टात आली असली तरी अनेक वर्षांपर्यंत त्यांची चर्चा होते. अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचंही नातं असंच काहीसं आहे. या दोघांचं रिलेशनशिप जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली. 2003 मध्ये विवेक-ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले होते. आता तब्बल 20 वर्षांनंतर विवेकचे वडील सुरेश […]

विवेक-ऐश्वर्याच्या वादानंतर सलमान खानसोबत कसं आहे नातं? सुरेश ओबेरॉय म्हणतात..
Suresh Oberoi and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 9:34 AM

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | बॉलिवूडमधील काही नाती संपुष्टात आली असली तरी अनेक वर्षांपर्यंत त्यांची चर्चा होते. अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचंही नातं असंच काहीसं आहे. या दोघांचं रिलेशनशिप जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली. 2003 मध्ये विवेक-ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले होते. आता तब्बल 20 वर्षांनंतर विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे मुलाच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. कारण विवेकने त्यांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. या मुलाखतीत ते सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता नातं कसं आहे, याविषयीही व्यक्त झाले.

विवेक-सलमानचं नातं

विवेक ओबेरॉयने दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. राम गोपाव वर्मा यांच्याकडून विवेकच्या नात्याबद्दल सर्वांत आधी समजल्याचं सुरेश ओबेरॉय म्हणाले. विवेक आणि ऐश्वर्या हे ‘क्यूँ हो गया ना’ या चित्रपटात एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र ऐश्वर्याचं सलमान खानसोबतचं भूतकाळातील नातं हे विवेकसाठी त्रासदायक ठरलं होतं. अचानक एकदा विवेकने सर्वांसमोर येऊन खुलासा केला की सलमान त्याला धमक्या देत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

सलमानशी आता कसं आहे नातं?

आता इतक्या वर्षांनंतर सलमानसोबत कसं नातं आहे, याविषयी बोलताना सुरेश ओबेरॉय म्हणाले, “तो जेव्हा कधी मला भेटतो, तेव्हा त्याची सिगारेट लपवतो आणि माझ्याशी खूप आदराने बोलतो. तो किंवा त्याचे वडील सलीम खान माझ्याशी खूप आदराने भेटतात आणि बोलतात. मी विवेकला नेहमीच सलीम यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्यास सांगतो. मी सलीम भाई यांचा खूप आदर करतो. काही गोष्टी घडल्या, पण माझं नातं त्यांच्यासोबत चांगलं आहे.”

विवेकने ऑक्टोबर 2010 मध्ये कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वाशी लग्न केलं. लग्नापूर्वी विवेक केवळ ऐश्वर्यासोबतच नाही तर इतरही काही जणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र ब्रेकअपनंतर त्यांच्याशी चांगली मैत्री जपल्याचं विवेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नात माझ्या एक्स गर्लफ्रेंड्सनीही हजेरी लावली होती, असंही तो म्हणाला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.