Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिघे साहेबांना पाहिल्यावर मला भीती वाटायची पण..; काय म्हणाले सुरेश वाडकर?

'धर्मवीर 2' या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते हा म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते आनंद दिघेंबद्दल व्यक्त झाले. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

दिघे साहेबांना पाहिल्यावर मला भीती वाटायची पण..; काय म्हणाले सुरेश वाडकर?
Suresh Wadkar and Anand DigheImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 4:26 PM

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं मोठ्या दिमाखात पार पडलं. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातील गाणी पाहिल्यानंतर चित्रपटाचं कथानक, कलाकार यांविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर म्हणाले, “दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला भीती वाटायची पण ते मनातून एकदम निर्मळ होते. हा चित्रपट 98 आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावल्याबदल मी सर्वांचे आभार मानतो.”

हे सुद्धा वाचा

‘धर्मवीर 2’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचं सुमधुर संगीत लाभलं आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे, बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी भाषेत स्वरबद्ध करण्यात आली आहेत. आजपासून (15 जुलै) ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर बघण्यासाठी उपलब्ध आहेत. येत्या 9 ऑगस्टला हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिलं आहे. ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.