सारा अली खान साठी सुशांत करणार होता ‘हे’ मोठं काम, लग्नापर्यंत पोहोचलं होतं नातं? पण…
Sara Ali Khan - Sushant Singh Rajput: लग्नापर्यंत पोहोचलं होतं सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं? अभिनेत्रीसाठी सुशांत करणार होता मोठं काम, पण..., सारा कायम असते खासगी आयुष्यामुळे चर्चेत....
Sara Ali Khan – Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी ‘केदारनाथ’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. साराने ‘केदारनाथ’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तर सुशांत याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. शिवाय सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. दोघांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या.
सुरुवातीला सारा अली खान – सुशांत सिंह राजपूत यांनी कधीच स्वतःच्या नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. पण सुशांत याच्या निधनांतर सारा हिची देखील चैकशी करण्यात आली. तेव्हा साराने सुशांत याच्यासोबत असलेलं नातं मान्य केलं. पण सुशांत कधीच नात्यात निष्ठावंत नव्हता. म्हणून आमचं ब्रेकअप झालं… असं देखील सारा चौकशी दरम्यान म्हणाली होती.
View this post on Instagram
अभिनेत्याच्या निधनानंतर सुशांतच्या फार्महाउसचा केअरटेकर रईस याने IANS ला अभिनेत्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली होती. लोनावळ्यात सुशांतचं फार्महाऊस आहे. केअरटेकरने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत 2019 मध्ये सारा आली खान हिला प्रपोज करणार होता.
केअरटेकरने दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी 2019 मध्ये वाढदिवसादरम्यान सुशांत, सारा हिला प्रपोज करणार होता. लग्नपर्यंत नातं पोहोचणार होतं की नाही… याबद्दल काही माहिती नाही. एवढंच नाही तर, सुशांतने सारासाठी गिफ्ट देखील मागवलं होतं. 2018 पासून सारा, सुशांत याच्या फार्महाऊसवर जायची. पण 2019 नंतर सारा कधीच फार्महाऊसवर आली नाही…’, असा दावा केअरटेकर कडून करण्यात आला होता.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सुशांत याच्या निधनानंतर सारा हिची देखील चौकशी करण्यात आली होती. तेव्हा अभिनेत्री सुशांत याच्यासोबत असलेलं नातं मान्य केलं होतं. सुशांत याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील सारा कायम सुशांत याच्यासोबत असलेल्या आठवणी शेअर करत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.