सुशांतचा भाऊ संजय राऊतांना भिडणार, मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा
संजय राऊत यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी नीरज सिंह बबलू यांनी केली आहे.
पाटणा : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच्या कुटुंबाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. (Sushant Singh Rajput Cousin BJP MLA Niraj Kumar Singh Bablu warns to file defamation case against Sanjay Raut)
संजय राऊत यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी नीरज सिंह बबलू यांनी केली आहे.
“मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेन. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.” अशी तयारी संजय राऊत यांनी आधीच दर्शवली होती. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“सुशांत किती वेळा वडिलांना भेटायला बिहारला गेला होता? मला त्याच्या वडिलांविषयी आदर आणि सद्भावना आहेत. मात्र त्यांचे संबंध ठीक नसल्याची माझ्याकडे माहिती आहे. काही गोष्टी तपासात समोर येतील” असे राऊत म्हणाले होते.
“मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारला विनंती करतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू” असे नीरज सिंह बबलू यांनी सांगितले.
हम केंद्र सरकार से आग्रह करते हैं कि ऐसा न हो मुंबई पुलिस के अंदर कोई गड़बड़ी हो जाए और गवाहों को निपटा दिया जाए। उच्चतम न्यायालय का फैसला आ जाए उसके बाद हम गवाहों की सुरक्षा और अन्य अहम बिंदुओं पर केंद्रीय गृह मंत्री से भी बात करेंगे : सुशांत के चचेरे भाई BJP MLA नीरज बबलू https://t.co/NV3b1doTSp
— Niraj Kumar Singh Bablu MLA (@MLANirajBablu) August 18, 2020
“साक्षीदारांना धमकावले जात आहे. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाहीत. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याची भीती आहे. साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे” असे नीरज सिंह बबलू म्हणाले.
Witnesses are being threatened, and Mumbai Police is not even providing protection to them. The way things are unfolding, the witnesses might get killed. We demand that witnesses should be given police protection: Niraj Singh Babloo, BJP MLA & a relative of #SushantSinghRajput pic.twitter.com/UgBNqur8vG
— ANI (@ANI) August 18, 2020
संबंधित बातमी :
… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत
(Sushant Singh Rajput Cousin BJP MLA Niraj Kumar Singh Bablu warns to file defamation case against Sanjay Raut)