AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Case | ‘शोविकच्या सांगण्यावरुन गांजा विकत घेऊन मिरांडाला द्यायचो’, एनसीबीच्या चौकशीत अबीदचा खुलासा

एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला ताब्यात घेतलं आहे.

SSR Case |  'शोविकच्या सांगण्यावरुन गांजा विकत घेऊन मिरांडाला द्यायचो', एनसीबीच्या चौकशीत अबीदचा खुलासा
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 6:59 PM

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणात आता एनसीबीने तपासात गती घेतली आहे (NCB Interrogating Showick Chakraborty). गांजा बाळगल्याप्रकरणी एनसीबीने चौघा जणांना अटक केली. यानंतर आता याचे धागेदोरे सुशांत सिंह प्रकरणाशी असल्याचं उघड होत असल्याने या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे (NCB Interrogating Showick Chakraborty).

एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला ताब्यात घेतलं आहे. यापैकी काही जणांना आज अटक होण्याची शक्यता आहे. सुशांत प्रकरणात ही पहिली अटक असेल.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीने तपास केला. मात्र, त्यांना काही मिळालं नाही. यामुळे ईडीने कुणालाही अटक केली नाही. सीबीआयचं वीस जणांचं पथक गेल्या 15 दिवसापासून मुंबईत येऊन तपास करतं आहे. मात्र, त्यांना ही काही मिळालं नाही. यामुळे त्यांनीही कुणाला अटक केली नाही. मात्र, याच प्रकरणाचा तपास आता केंद्राच अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. त्यांनी मुंबई आल्याबरोबर कारवाई सुरु केली. त्यांनी 28 ऑगस्ट रोजी तीन जणांना अटक केली.

पहिली अटक अब्बास रमझान अली याची झाली. त्याच्याकडे 46 ग्राम गांजा मिळाला. त्याने आपण हा गांजा कर्ण अरोरा यांच्याकडून घेतल्याचं सांगितल्यावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पवई येथून कर्ण अरोरा याला अटक केली. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा मिळाला. या दोघांच्या चौकशीत झैद विलात्रा याच नाव पुढे आल्याने त्याला ही 2 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली (NCB Interrogating Showick Chakraborty).

झैद याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलन आणि परदेशी चलन सापडलं. हे पैसे गांजाच्या विक्रीतून त्याला मिळाले होते. चौकशीत त्याने त्याच्याकडून गांजा विकत घेणाऱ्या अनेकांची नाव उघड केली. झैद याने अबीद बसिद परिहार हा देखील गांजा विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्याचं सांगितल्याने अबीद याला ही अटक करण्यात आली.

अबीदने आपण हा गांजा शोविक याच्या सांगण्यावरुन विकत घेत होतो आणि तो सॅम्युल मिरांडा याला देत होतो, असं सांगितलं आहे. अब्दुल बसीदच्या चौकशीत फिल्म क्षेत्रातील अनेक लोकांची नाव उघड झाली आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. यावेळी शोविक याचं नाव आल्याने त्याला आणि मिरांडा या दोघांना एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

तर सीबीआयने आज दिशा सालियन संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावलं आहे. बंटी सचदेव याची आज ही चौकशी सुरु आहे. गेल्या पाच तासापासून चौकही सुरु आहे. दिशा आणि श्रुती मोदी या एकत्र काम करायचा. श्रुतीच्या गैरहजेरीत काही दिवस दिशाने सुशांतची सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम केलं होतं. याच मुद्यांवर सीबीआयचा तपास सुरु आहे. त्याचप्रमाणे आज सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रसिध्द डॉक्टर हरीश शेट्टी यांची तपास कामात मदत घेतली.

सिबीआयने आज उदय सिंह गौरी यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. सुशांत सिंहने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री डायरेक्टर निखिल अडवाणी, निर्माता रमेश तौलानी आणि कास्टिंग डायरेक्टर असलेल्या उदय सिंह गौरीसोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलणं केलं होतं. त्या अनुषंगाने गौरी यांची चौकशी झाली.

NCB Interrogating Showick Chakraborty

संबंधित बातम्या :

पोलिसांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित, कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : अनिल देशमुख

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार

SSR Death Case | सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती NCB च्या ताब्यात, रियाच्या घराची झाडाझडती

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.