मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं

सुशांतचा कुत्रा सतत त्याचा फोटो जवळ घेऊन बसलेला असतो. तो जेवणही करत नाही. (Sushant Singh Rajput).

मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 6:48 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकाली निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने तर जेवणही सोडलं आहे. ती व्यक्ती म्हणजे सुशांतचा लाडका कुत्रा. सुशांतने लॅब ब्रीड डॉग पाळला होता. या कुत्र्यासोबत सुशांतचं वेगळं भावनिक नातं होतं (Sushant Singh Rajputs).

मूक प्राण्यांना स्पर्शाची प्रेमळ भाषा कळते. मालकाने जितकं प्रेम दिलं त्यापेक्षा कितीतरी दुप्पटपटीने ते मालकावर प्रेम करतात. सुशांत आपल्या कुत्र्यावर प्रचंड प्रेम करायचा. त्याच्यासोबत खेळायचा, मस्ती करायचा. मात्र, सुशांतच्या अकाली एक्झिटने कुत्र्यालाही धक्का बसला आहे (Sushant Singh Rajput).

सुशांतचा कुत्रा सतत त्याचा फोटो जवळ घेऊन बसलेला असतो. तो जेवणही करत नाही. काही माणसांनी सुशांतला रडवलं, मात्र आज एक मूक जनावर सुशांतच्या आठवणीत रडत आहे.

सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

हेही वाचा : सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलीस आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवत आहेत. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली.

रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.

त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा.

सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Ashes immersion | नावेतून गंगा नदी पार, सुशांतसिंह राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून विसर्जन

Sushant Singh Rajput suicide investigation | रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये

Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.