Sushant Singh Rajput: ‘बदला घेण्यासाठी तो परत आला…’, सुशांत संबंधीत व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

सुशांत सिंग राजपूत संबंधीत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ... व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणाली, 'बदला घेण्यासाठी तो परत आला...',

Sushant Singh Rajput: 'बदला घेण्यासाठी तो परत आला...', सुशांत संबंधीत व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:26 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फार कमी काळात अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण सुशांतला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला तीन वर्ष उलटली आहेत. तरी देखील चाहत्यांच्या मनात सुशांतबद्दल असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. आज देखील चाहते सुशांत सिंह राजपूत याच्या जुन्या आठवणी ताज्या करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांना अभिनेत्याची आठवण येत असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून त्या व्हिडीओचा संबंध सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

सुशांत सारख्या दिसणाऱ्या तरुणाचं नाव डेनिम आयन असं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने डेनिम आयन याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत भावना व्यक्त करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ओएमजी सेम टू सेम।’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हा हुबेहूब सुशांत याच्यासारखा दिसत आहे..’ सध्या सर्वत्र डेनिम आयन याच्या लूकची चर्चा रंगत आहे.

फक्त नेटकरी नाही तर, बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिने देखील डेनिम आयन याच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ‘बदला घेण्यासाठी तो परत आला…’ असं राखी कमेंट करत म्हणाली आहे. सोशल मीडियावर डेनिम याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. राखी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने तीन वर्षांपूर्वी म्हणजे १४ जून २०२० मध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण झाली. पण तीन वर्षांनंतर देखील अभिनेत्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही..

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.