ज्या घरात झालं सुशांतचं निधन, अडीच वर्षांनंतरही कोणीच त्यात राहायला तयार नाही

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहण्यासाठी घाबरत आहेत लोक; ब्रोकरने सांगितलं कारण

ज्या घरात झालं सुशांतचं निधन, अडीच वर्षांनंतरही कोणीच त्यात राहायला तयार नाही
ड्रग प्रकरणातील आरोपींच्या आवाजाच्या टेस्टला न्यायालयाची परवानगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 8:35 AM

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत मजल गाठली होती. बॉलिवूडमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आणि त्याच्या याच कामाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. सुशांतच्या निधनाची बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. असंख्य चाहते त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत.

14 जून 2020 जून मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला अडीच वर्ष उलटून गेलंय. मात्र तरीही या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी कोणीच नवीन भाडेकरू मिळत नाहीये.

हे सुद्धा वाचा

नुकतंच रफीक मर्चंट नावाच्या एका रिअल इस्टेट ब्रोकरने या सी-फेसिंग अपार्टमेंटचा एक व्हिडीओ शेअर केला. महिन्याला पाच लाख रुपये इतकं या फ्लॅटचं भाडं असल्याचंही त्याने म्हटलंय.

ज्या फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं, त्या फ्लॅटमध्ये राहायला लोक घाबरत आहेत, असं रफीकने एका मुलाखतीत म्हटलंय. आधी जेव्हा लोकांना कळायचं की याच फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं होतं, तेव्हा लोक हा फ्लॅट बघायलासुद्धा यायचे नाही. आता बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू लोक फ्लॅट बघायला येऊ लागले आहेत. मात्र कोणासोबत डील पक्की होऊ शकली नाही.

वांद्र्यातील या फ्लॅटचा मालका एक एनआरआय आहे. तो आता कोणत्याच बॉलिवूड कलाकाराला हा फ्लॅट भाडेतत्त्वावर देऊ इच्छित नाही. एखाद्या कॉर्पोरेट व्यक्तीला तो फ्लॅट देऊ इच्छितो आहे.

सुशांतच्या निधनाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे. त्याने आत्महत्या केली होती, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडविरोधात एक लाटच निर्माण झाली.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...