‘Sushant Singh Rajput ची आत्महत्या नाही, तर हत्याच…’, शवविच्छेदन पाहिलेल्या प्रथमदर्शीकडून मोठा खुलासा

सुशांतच्या निधनानंतर त्याला कूपर रुग्णालय शविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं. आता दोन वर्षांनी अभिनेत्याचं शवविच्छेद करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे.

'Sushant Singh Rajput ची आत्महत्या नाही, तर हत्याच...', शवविच्छेदन पाहिलेल्या प्रथमदर्शीकडून मोठा खुलासा
ड्रग प्रकरणातील आरोपींच्या आवाजाच्या टेस्टला न्यायालयाची परवानगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 11:15 AM

Sushant Singh Rajput case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput ) 14 जून 2020 मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. पण अभिनेत्याच्या निधनानंतर ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. सुशांत आत्महत्याप्रकरणी आजही अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या थक्क करणाऱ्या आहेत. सुशांतच्या निधनानंतर त्याला कूपर रुग्णालयात शविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं. आता दोन वर्षांनी अभिनेत्याचं शवविच्छेद करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. (Sushant Singh Rajput case )

रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा मोठा खुलासा केला आहे. रुपकुमार शाह म्हणाले, ‘जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह आले होते. त्यामध्ये एक व्हीआयपी मृतदेह असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, पण कोण आहे हे सुरुवातीला कळालं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा मृतदेहावरचा कपडा कढला तेव्हा शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. गळ्यावर दोन-तीन वर्ण होते. हात-पाय मार लागून तुटल्यासारखे… म्हणजे मुक्का मार लागल्यानंतर होणाऱ्या खुणा शरीरावर होत्या. व्हिडीओ शुटिंग व्हायला हवी होती, पण ती झाली की नाही… किंवा केली नाही… वरिष्ठांना देखील सांगण्यात आलं होतं फक्त फोटोग्राफवर काम करायचं. म्हणून आम्ही त्यावर काम केलं.’

रुपकुमार शाह यांच्या मोठ्या वक्तव्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. पुढे शाह यांनी पहिल्यांदा मृतदेह पाहिला तेव्हा तुम्ही डॉक्टरांना काय सांगितलं? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. या प्रश्नानंतर अभिनेत्याचा मृत्यूचं मोठं कारण समोर आले.

शाह म्हणाले, ‘जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी की वरिष्ठांना सांगितलं, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करायला हवं. असं मी वरिष्ठांना सांगितलं. पण ते म्हणाले लवकरात-लवकर फोटोंवर काम करायचं आहे आणि मृतदेह द्यायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही रात्री शविच्छेदन केलं.’ आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.