मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुशांत याच्या बहिणीने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्याची बहीण म्हणाली, ‘आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आमच्या भावाला कोणी मारलं. त्याच्यासोबत काय झालं. जो पर्यंत आम्हाला सत्य कळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आम्हाला सत्य शोधून काढायचं आहे. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आवाज बुलंद करावा लागेल… सीबीआयने चौकशी करावी आणि लवकरात लवकर सत्य समोर आणावं. अशी आमची मागणी आहे…’ सध्या सर्वत्र सुशांत याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सुशांत याच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याची बहीण श्वेता सिंह किर्ती कायम सुशांत याच्याबद्दल मोठं वक्तव्य करत असते. सुशांत याच्या निधनानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या..
सुंशात डिप्रेशनचा सामना करत होता… रिपोर्टनुसार, सुशांत डिप्रेशनसाठी औषधं घेत होता. सुशांत याचं नाव ड्रग्ज केससोबत देखील जोडण्यात आलं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला आणि तिच्या भावाला तुरुंगात जावं लागलं होतं.
सुशांत याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर देखील सुशांत याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुशांत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होता.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत असलेलं नातं देखील चाहत्यांमध्ये चर्चेत होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुशांत याचं निधन झालं असलं तरी, चाहते अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत. त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.