सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, नोकरांपाठोपाठ बॉडीगार्डही साक्षीदार होणार

गेल्या काही दिवसात सुशांत सिंग राजपूतशी निगडीत ड्रग्ज प्रकरणात अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे येत आहेत (Sushant Singh Rajput Bodyguard witness)

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, नोकरांपाठोपाठ बॉडीगार्डही साक्षीदार होणार
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 10:26 AM

सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide) वर्षभरानंतरही अनेक खुलासे होत आहेत. सुशांतचे निकटवर्तीय असलेले अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे आले आहेत. सुशांतचा बॉडीगार्ड सागर सोहिल काल साक्षीदार झाला. येत्या काही दिवसात सुशांतचे काही मित्रही साक्षीदार होण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. (Sushant Singh Rajput Suicide Bodyguard Sagar Sohil ready to become witness)

गेल्या काही दिवसात सुशांत सिंग राजपूतशी निगडीत ड्रग्ज प्रकरणात अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे येत आहेत. गेल्या आठवड्यात सुशांतचे नोकर नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे साक्षीदार झाले. तर सुशांतचा बॉडीगार्ड सागर सोहिल काल साक्षीदार झाला.

मध्यरात्रीपर्यंत सागरची चौकशी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सागरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मालाडमध्ये एका ठिकाणी त्याची अनेक तास चौकशी झाली. ही चौकशी मध्यरात्रीपर्यंत चालली होती. यानंतर त्याला काल सकाळी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा त्याने आपल्याला साक्षीदार व्हायचं असल्याचं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर त्याला किल्ला कोर्टातील एका न्यायाधीशांच्या समोर उभं करण्यात आलं. तिथे सागर याचा सीआरपीसी 164 नुसार जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.

सुशांतच्या फ्लॅटमेट्सची पांगापांग

अभिनेता सुशांत सिंग याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात अनेक व्यक्ती राहत होत्या. मात्र, त्याने आत्महत्या केल्यानंतर बहुतांश जण निघून गेले. कुणी परदेशात गेलं तर कुणी देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी या सर्वांना शोधायला सुरुवात केली.

आधी सिद्धार्थ पिठाणी याला अटक करण्यात आली. त्यानंतर केशव आणि नीरज यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली. यानंतर बॉडीगार्ड सागरला साक्षीदार करण्यात आलं. याच पद्धतीने अनेक व्यक्तींची नावं एनसीबी अधिकाऱ्यांच्या तपासात उघड झाली आहेत. त्यांना लवकरच समन्स बजावून चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण, दोन फरार ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या ताब्यात

(Sushant Singh Rajput Bodyguard witness)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.