Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला (Sushant Singh Rajput Suicide Case Investigation) आहे.

Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 6:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास आता चार वेगवेगळे विभाग करत आहेत. जवळपास चार यंत्रणा सुशांतच्या आत्महत्येमागचे गूढ शोधून काढत आहेत. सुशांत आत्महत्या करुच शकत नाही, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केली होता. यानंतर सर्व तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास केला जात आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Investigation)

सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत.

वांद्रे पोलिसांचा तपास 

सुरुवातीला सुशांत सोबत जे होते त्यांच्याकडे याबाबत पोलिसांनी चौकशी केली. त्यांना कुणावर संशय वाटतो का? हे विचारण्यात आलं. सुशांतचे नातेवाईक जे सांगतील, जो संशय व्यक्त करतील त्याची पोलिसांनी नोंद केली. सुशांतचे नोकर, वॉचमन यांच्याकडे चौकशी करण्यात आली. (Sushant Singh Rajput Suicide Case Investigation)

सुशांतच्या घरातील अनेक वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या. वांद्रे पोलीस अजूनही सुशांतचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी किंवा इतरांना काही सांगायचं असल्यास त्यांचं म्हणणं नोंद करत आहेत. सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे ही आज सुशांतच्या वडिलांना भेटायला आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडून ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

सायबर सेलचा तपास

सुशांतच्या मृत्यू बाबत सायबर सेलकडूनही तपास सुरू झाला आहे. सुशांतच्या घरातून त्याचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. या वस्तू सायबर सेलचा ताब्यात देण्यात आल्या आहेत. सुशांत ट्विटर, फेसबुक अकाऊंट याचा तपास करण्यात येत आहे. या माध्यमातून त्याने आपल्या काही भावना व्यक्त केल्या होत्या का? कुणाबाबत नाराजी व्यक्त केली होती का? त्याला कुणी काही बोललं होत का? त्यामुळे हा प्रकार घडला नाही ना? याचा शोध सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – Sushant Singh Rajput | अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला, पोलिसांकडून जुजबी चौकशी

फॉरेन्सिक विभागाचा तपास

सुशांतने आत्महत्या करून टोकाचं पाऊल उचललं आहे. यावेळी त्याने औषध घेतलं होतं का? काही केमिकल घेतलं होतं का? हे औषध, केमिकल घेतल्यानंतर त्याने आत्महत्या केली का? तसंच त्याला कुणी काही खायला दिलं होतं का? याचा तपास फॉरेन्सिक विभाग करत आहे. सुशांतच्या घरातून अनेक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मोबाइल फोन, लॅपटॉप याशिवाय त्याचे पेन, ग्लास इत्यादी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचा तपास सुरु झाला आहे.

मुंबई क्राईम ब्रांचकडूनही तपास

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर तात्काळ क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यानंतर आता गुप्तपणे याबाबत काही संशयास्पद आहे का? याचा तपास क्राईम ब्रांच करत आहे.

सुशांत सिंह याचे मेव्हणे हे आय. ए. एस. अधिकारी आहेत. ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहेत. यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्व यंत्रणा कामाला सक्रिय केल्या आहेत. (Sushant Singh Rajput Suicide Case Investigation)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.