Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Complaint file against Rhea Chakraborty).

Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 9:35 PM

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Complaint file against Rhea Chakraborty). रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण होती. मात्र, रियाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असा आरोप मुजफ्फरचे तक्रारदार कुंदन कुमार यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी 24 जून रोजी सुनावणी होणार आहे (Complaint file against Rhea Chakraborty).

“रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतचा आपल्या फायद्यासाठी फक्त वापर केला. रियाने सुशांतला मानसिक त्रास दिला. तिने आपलं करियर सेट झाल्यावर सुशांतला सोडून दिलं”, असं कुंदन कुमार म्हणाले आहेत.

हेही वाचा : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग

कुंदन कुमार यांच्या वकिलांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “माझे क्लायंट सुशांतचे मोठे फॅन आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी कलम 306 आणि 420 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे”, असं वकील म्हणाले.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून तर अगदी घरातील नोकरांपर्यंतचा समावेश आहे. या प्रकरणी सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

रिया चक्रवर्तीचा जबाब काय?

पहिली भेट

“माझी आणि सुशांतची 2013 मध्ये ओळख झाली. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ नावाचा चित्रपट करत होता, तर मी ‘मेरे डॅडी की मारुती’ हा सिनेमा करत होते. या दोन्ही चित्रपटाचे सेट जवळ-जवळ होते. त्याच ठिकाणी आम्ही पहिल्यांदा भेटलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

तेव्हा सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये

“वेगवेगळ्या पार्टीमध्ये आमची भेट होत असे. एका पार्टीत आमची मैत्री झाली. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर आम्ही एकमेकांना अधून मधून भेटत होतो. पण त्या काळात सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.” अशी माहितीही रियाने दिली.

रिलेशनशिपला सुरुवात

“आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. नंतर 2017-2018 च्या दरम्यान आम्ही एक प्रॉडक्शन हाऊस सोडलं आणि वेगवेगळे काम करु लागलो. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

सुशांतच्या मनात सतत विचार

“सुशांतच्या मनात सतत काही ना काही विचार चालत असायचा. पण त्या गोष्टी तो कधी कोणाला सांगायचा नाही. त्याला काही टेंशन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुणे येथील पवनामधील त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा. त्याला सतत डिप्रेशन येत होतं. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आणि त्यानंतर त्याला औषध घ्यावं लागलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने औषध घेणं बंद केलं होतं.” असा दावा रिया चक्रवर्ती हिने केला.

6 जूनपासून मी सुशांतसोबत त्याच्या घरी

“6 जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते. काही दिवस राहिले. त्यावेळी पुन्हा तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने मला तू तुझ्या घरी जा, मी एकट्याला राहायचं आहे, असं सांगितलं. यानंतर मी त्याला सोडून माझ्या घरी निघून आले. त्याला एकांतवास हवा असेल म्हणून मी निघून आले. मात्र 14 जून रोजी त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मला धक्का बसला. तो या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं.” असंही रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना सांगितलं. (Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

हेही वाचा : तब्बल नऊ तास रिया चक्रवर्तीची विचारपूस, वांद्रे पोलिसात जबाब नोंदवला

पोलिसांनी आतापर्यंत कोणा-कोणाचे जबाब नोंदवले

  • के. ले. सिंग, सुशांतचे वडील
  • नितु सिंग, बहीण
  • मीतू सिंग, बहीण
  • सिद्धार्थ पिठाणी आर्ट डायरेक्ट
  • नीरज, सुशांतचा आचारी
  • केशव, सुशांतचा आचारी
  • दीपेश सावंत, केअर टेकर
  • मुकेश चाब्रा, कास्टिंग डायरेक्टर
  • श्रुती मोदी, बिझनेस मॅनेजर
  • राधिका निहलानी, पीआर
  • रिया चक्रवर्ती, प्रेयसी
  • चावी बनवणारा
  • महेश शेट्टी, मित्र
  • केरसी चावडा, सुशांत वर उपचार करणारे डॉक्टर
  • अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानि, कायदेशीर सल्लागार
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.