Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार

सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाचा आता नव्याने तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतसोबत माजी मॅनेजरच्या आत्महत्येचाही नव्याने तपास, मैत्रीण रियाचाही जबाब घेणार
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 6:45 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या (Sushant Singh Rajput Suicide Update) मृत्यू बाबत पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असला, तरी याबाबत पोलिसांचा तपास सुरुच राहणार आहे. सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या घटनेबाबत केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करुन न थांबता ज्या-ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यानुसार, तपास होणार आहे. सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) आत्महत्या प्रकरणाचा आता नव्याने तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सुशांत याची जवळची मैत्रीण रियाचा (Rhea Chakraborty) पोलीस उद्या जबाब नोंदवणार (Sushant Singh Rajput Suicide Update) आहेत.

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सुशांतचे वडील आणि इतर नातेवाईक मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. सुशांतच्या अंत्यसंस्कारवेळी बॉलिवूडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. सुशांतने आत्महत्या केली आहे. मात्र, याबाबत अनेक शंका व्यक्त केली जात आहे. सुशांतचं मैत्रिणीसोबत वाद झाला होता. यामुळे त्याने आत्महत्या केली.

सुशांतला गेल्या तीन महिन्यापासून काहीच काम नव्हते. यामुळे त्याच्याकडे पैशांची चणचण निर्माण झाली होती. यामुळे तो तणावाखाली होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

तर, 8 जून रोजी दिशा सालियनने चौदाव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशा ही सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यूबाबत ही मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Sushant Singh Rajput Suicide Update).

संबंधित बातम्या :

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

Sushant Singh Rajput Suicide : आभासी आवाजही ऐकू यायचे, घाबरलेली मैत्रीण निघून गेली, सुशांतसोबत काय काय घडलं?

“का? का? का?” सुशांतच्या आत्महत्येचे कोडे अनाकलनीय, महानायकही गहिवरले

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.