“तो खूपच अस्वस्थ..”; सुशांत सिंह राजपूतविषयी ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकाचा खुलासा

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'केदारनाथ' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सुशांतची मानसिक अवस्था कशी होती, याचा खुलासा दिग्दर्शक अभिषेक कपूरने सहा वर्षांनंतर केला आहे.

तो खूपच अस्वस्थ..; सुशांत सिंह राजपूतविषयी 'केदारनाथ'च्या दिग्दर्शकाचा खुलासा
Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 3:24 PM

मुंबई : 5 मार्च 2024 | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ आणि ‘काय पो चे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला दिग्दर्शक अभिषेक कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. केदारनाथच्या शूटिंगदरम्यान सुशांत फार अस्वस्थ होता असं त्याने सांगितलं. 14 जून 2020 रोजी सुशांत वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केल्याची नोंद सुरुवातीला मुंबई पोलिसांनी केली होती. मात्र सर्वच स्तरांतून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याप्रकरणी मोठ्या तपासाला सुरुवात झाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ‘काय पो चे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. “ऑडिशनच्या वेळी सुशांतचं वजन खूप जास्त होतं. मी त्याला एका अमेरिकी अभिनेत्याला फोटो दाखवला आणि त्याच्यासारखं दिसण्यास सांगितलं होतं. कारण त्याला एका क्रिकेटरची भूमिका साकारायची होती. त्यावेळी तो फार काही बोलला नाही. कारण तो तसा मितभाषीच होता. पण पुढील तीन महिन्यात त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली. तो सकाळी सहा वाजता क्रिकेटच्या सरावासाठी आणि जिम ट्रेनिंगसाठी यायचा”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सुशांतशी खास कनेक्शन जोडलं गेल्याने त्याला ‘फितूर’ चित्रपटातही भूमिका द्यायचा विचार अभिषेकने केला होता. मात्र तसं होऊ न शकल्याने ‘केदारनाथ’साठी त्याने सुशांतला साइन केलं होतं. “केदारनाथ या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलसाठी सारा आणि सुशांतने अत्यंत थंड वातावरणात शूटिंग केलं होतं. त्यांना रात्रभर पावसाचा सीन शूट करायचा होता. अत्यंत थंडीत रात्रभर भिजत सुशांतने शूटिंग पूर्ण केलं होतं. कामाप्रती असलेली त्याची मेहनत पाहून सारासुद्धा प्रभावित झाली होती,” असं अभिषेक पुढे म्हणाला.

“सुशांतने त्याची सुरुवात केली होती. त्याने पूर्णपणे भिजून शूटिंग करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सारासुद्धा त्याच्याकडे पाहून पूर्ण मेहनतीने काम करू लागली होती. सुशांतमुळे तिने चित्रपटासाठी अधिक मेहनत घेतली होती. पण सुशांत त्या दिवसांत अस्वस्थ होता. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तसा खूप स्ट्राँग होता. पण मनातल्या मनात कोणती तरी गोष्ट त्याला सतावत होती. तो स्वत:ला सर्वांपासून दूर नेत होता “, असा खुलासा अभिषेकने केला.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.