सुशांतच्या बहिणीने केले पहिले रिल्स रेकॉर्ड, चाहते म्हणाले…
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) बहीण श्वेता सिंह किर्ती (Shweta singh kirti) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) बहीण श्वेता सिंह किर्ती (Shweta singh kirti) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. भावाच्या निधनानंतर ती सोशल मीडियाद्वारे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे. त्याचबरोबर श्वेता सिंह कीर्ती तिचा पहिला रील्स रेकॉर्ड करणार आहे. श्वेता सिंहने इन्स्टाग्रामवरून हि माहिती दिली आहे. यासह श्वेताने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये ती भजन म्हणताना दिसत आहे. (Sushant Singh Rajput’s sister Shweta Singh Kirti made the first reels record)
श्वेता या व्हिडिओमध्ये गोविंद बोलो गोपाळ बोलो हे भजन म्हणले आहे. श्वेताच्या या व्हिडीओवर सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये काही जणांचे म्हणणे आहे की, तुमचे डोळे सुशांत सारखेच आहेत. या बरोबरच लोकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताचा मॉडेलिंगच्या जगाशी संबंधित आहे. श्वेताला लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि फॅशनची प्रचंड आवड आहे.
View this post on Instagram
सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले. स्टार प्लसवरील ‘किस देश मै हे मेरा दिल’ ही त्याची पहिली सिरीअल. त्यानंतर जवळपास तीन वर्षं त्याने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात काम केले. यात त्याने मानव ची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.
एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सुशांतने चित्रपट पदार्पण कोई पो चे (2013) या चित्रपटातून केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर अॅवार्ड फॉर बेस्ट मेल डेब्युटसाठी नामांकन मिळालं. यानंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स (2013) या चित्रपटात काम केलं. त्याने सर्वाधिक गल्ला गमावणाऱ्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या पीके चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका केली.
संबंधित बातम्या :
Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ
रणवीर सिंहचा 83 चित्रपट ‘या’ तारखेला होऊ शकतो प्रदर्शित !
Sunny Leone | लाखोंचा अॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा
(Sushant Singh Rajput’s sister Shweta Singh Kirti made the first reels record)