घटस्फोटानंतरही एक्स पतीसोबत फिरत आहे ‘ही’ अभिनेत्री, परत सुष्मित सेनच्या भावाला करत आहे डेट?, अखेर…
सुष्मित सेन हिचा भाऊ राजीव सेन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. राजीव सेन याचे काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर काही फोटो हे व्हायरल होताना दिसले. हे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता त्याबद्दलच बोलताना राजीव सेन हा दिसला आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ आणि अभिनेता राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारु असोपा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. काही वर्षे एकमेकांना डेट करून चारु असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न केले. मात्र, लग्न होऊन काही दिवसांमध्येच यांच्यामध्ये वाद झाले. 2023 मध्ये या दोघांनी घटस्फोट देखील घेतला. चारु असोपा आणि राजीव सेन यांना एक मुलगी देखील आहे. मध्यंतरी चारु असोपा हिने राजीव सेन याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले होते. हेच नाहीतर तिने राजीव सेनचे विवाहबाह्य संबंध असल्याचे देखील म्हटले.
राजीव सेन याने आपल्याला कशाप्रकारे धोका दिला हे सांगताना चक्क चारु असोपा ही दिसली होती. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. मात्र, आता चारु असोपा आणि राजीव सेन यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.
घटस्फोटानंतर दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. हेच नाहीतर हे दोघे दुबईला देखील एकत्र जाऊन आले. यानंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. घटस्फोटानंतर दोघे परत एकदा एकत्र आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता यावरच पहिल्यांदाच बोलताना राजीव सेन हा दिलाय.
राजीव सेन हा म्हणाला की, मी आणि चारु फक्त चांगले मित्र बनलो आहोत आणि एक पालक म्हणून आम्ही आमची मुलगी जियाना हिला वेळ देत आहोत. यावर मी पुढे काहीच बोलू इच्छित नाहीये. हे खूप जास्त गरजेचे आहे की, मी जियानाला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा आणि आमची दुबईचे प्लनिंग जबरदस्त झाले. मला जियानासोबत जास्त वेळ घालवायला मिळाला.
माझ्या पर्सनल लाईफबद्दल जे काही सोशल मीडियावर चुकीचे सुरू आहे, त्याचा फरक कधीच माझ्यावर अजिबात पडत नाही. आता राजीव सेन याने काही गोष्टी स्पष्ट केल्याचे दिसत आहे. चारु असोपा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती दिसते. मध्यंतरी तिने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासही सुरूवात केली होती, मात्र मुलीला वेळ देऊ शकत नसल्याने तिने परत आपला निर्णय बदलला.