बहिणीचे दोन ब्रेकअप, भावाचं वैवाहिक आयुष्य संकटात; तरीही जल्लोषात New Year सेलिब्रेशन
२०२२ मध्ये खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही सेलिब्रिटी भाऊ-बहिणीचं हटके New Year सेलिब्रेशन... पाहा फोटो
Sushmita Sen Rajeev Sen New Year Celebration: शनिवारी २०२२ वर्षाला अखेरचा निरोप दिल्यानंतर सेलिब्रिटींनी त्यांच्या New Year सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशात बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेन कुटुंब देखील मागे राहिलं नाही. अभिनेत्री सुष्मिता सेनने कुटुंबासोबत नव्या वर्षाचं स्वागत दुबईत केलं. यावेळी अभिनेत्रीने आई, भाऊ आणि दोन मुलींसह नव्या वर्षाचं स्वागत केलं. सुष्मिताचा भाऊ राजीव सेनने नव्या वर्षाच्या स्वागताचे फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केले आहेत.
कुटुंबासोबत फोटो शेअर करत राजीवने कॅप्शनमध्ये, ‘भूतकाळ दूर आणि नवी सुरुवात करण्याची वेळ…’ असं लिहिलं आहे. शिवाय त्याने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. सध्या राजीवची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होत आहे.
View this post on Instagram
पण राजीवची पोस्ट पाहून चाहत्यांनी त्याला पत्नी चारू असोपा आणि मुलगी झियाना कुठे आहे? असं विचारलं. दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून सेन भावंड त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. राजीव आणि चारु घटस्फोट घेणार असल्याच्य चर्चा रंगल्या आहे. एवढंच नाही, तर दोघे अनेक दिवसांपासून विभक्त राहत आहेत.
View this post on Instagram
अशात चारुने मुलगी झियानासोबत भारतात नव्या वर्षाचं स्वागत केलं. चारुने देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘2023 मध्ये आनंदाने प्रवेश करत आहे…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.
सुष्मिता सेनचे दोन ब्रेकअप गेल्या वर्षी सुष्मिता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली. रोहमन शॉल आणि उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अखेर दोघांसोबत सुष्मिताचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली.