Lalit Modi | सुष्मिता सेननंतर ललित मोदी ‘या’ सुपरमॉडेलला करतायत डेट? कोण आहे उज्ज्वला राऊत?

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. नुकतंच त्यांना हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पाहिलं गेलं. या पार्टीतील सुपरमॉडेल उज्ज्वला राऊतसोबत त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.

Lalit Modi | सुष्मिता सेननंतर ललित मोदी 'या' सुपरमॉडेलला करतायत डेट? कोण आहे उज्ज्वला राऊत?
कोण आहे उज्ज्वला राऊत?Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 1:03 PM

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे नुकतेच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. ब्रिटिश मूळच्या त्रिणाशी त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी तिसरं लग्न केलं असून लंडनमध्ये दोघांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा फोटो आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांचा आहे. या फोटोमध्ये ते सुपरमॉडेल उज्ज्वला राऊतसोबत दिसले. त्यामुळे अभिनेत्री सुष्मिता सेननंतर ते उज्ज्वलाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

कोण आहे उज्ज्वला राऊत?

उज्ज्वला राऊतचा जन्म 1978 मध्ये झाला असून ती नव्वदच्या दशकातील सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाते. तिचे वडील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त होते. उज्ज्वलाने किशोरवयातच मॉडेलिंगला सुरुवात केली. 1996 मध्ये 17 वर्षीय उज्ज्वलाने फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला आणि त्यात तिने ‘फेमिना लूक ऑफ द इअर’चा किताब जिंकला. त्याच वर्षी फ्रान्समधल्या 1996 एलिट मॉडेल लूक कॉन्टेस्टमध्ये तिने टॉप 15 मध्ये स्थान मिळवलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ujjwala Raut (@ujjwalaraut)

उज्ज्वला राऊतचं मॉडेलिंग आणि टीव्ही करिअर

नव्वदच्या दशकात उज्ज्वला ही देशातील टॉप मॉडेल बनली. यवेस सेंट-लॉरेंट, रॉबर्टो कॅव्हली, ह्युगो बॉस, डॉल्से आणि गबाना, गुची, गिव्हेंची, व्हॅलेंटिनो, ऑस्कर दे ला रेंटा आणि एमिलियो पुची यांसारख्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी तिने रॅम्प वॉक केलं. व्हिक्टोरियाच्या सिक्रेट फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय ठरली. 2002 आणि 2003 या सलग दोन वर्षांसाठी तिने रॅम्प वॉक केला होता. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इअर या शोमध्ये परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये ती मिलिंद सोमणसोबत झळकली होती.

उज्ज्वला राऊतचं खासगी आयुष्य

जून 2004 मध्ये उज्ज्वला राऊतने स्कॉटिश दिग्दर्शक मॅक्सवेल स्टेरीशी लग्न केलं. मात्र 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. या दोघांना क्षा नावाची मुलगी आहे. मुलीच्या पालकत्वावरून दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.