सुष्मिता सेन हिचा एक्स – बॉयफ्रेंड ललित मोदी रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीच्या भावाकडून विचारपूस
सुष्मिता सेन हिचा एक्स - बॉयफ्रेंड ललित मोदीचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीचा भाऊ राजीव सेन याने विचारपूस केल्यानंतर चर्चांना उधाण
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुष्मिता आणि ललित मोदी दोघांचे रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. ललित मोदी याने सुष्मिता हिच्यासोबत काही फोटो पोस्ट करत एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. पण आता पुन्हा ललित मोदी प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. ललित मोदी याने एक पोस्ट शेअर करत स्वतःच्या प्रकृतीबाबत सांगितलं आहे.
ललित मोदी सध्या लंडन याठिकाणी उपचार घेत आहे. ललित मोदीला कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणून ललित मोदी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदी कोरोनाची लक्षणं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मोदीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सध्या ललित मोदीचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने देखील कमेंट करत ललित मोदीच्या प्रकृतीची विचारपूस केली. रजीवच्या कमेंटनंतर चर्चांना उधाणं आलं आहे.
सुष्मिता सेन आणि ललित मोदी ललित मोदी पूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत सुष्मिताचं नाव जोडण्यात आलं. सुष्मिता कायम तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली. अनेकांसोबत सुष्मिता रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगण्यात आलं, पण अभिनेत्री कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही अभिनेत्री एकटी आयुष्य जगते
महत्त्वाचं म्हणजे कोट्यधीश ललित मोदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिता सेन हिच्यासोबतच्या नात्याची कबुली देत सर्वांना धक्का. दिला. ललितने सुष्मितासोबत काही खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हा सुष्मिताचं नाव ललित मोदीला जोडण्यात आलं. पण हे नातं अधिक काळ टिकलं नाही.