Sushmita Sen: ये इश्क है मंजुर? ललित मोदींच्या फ़ोटोज नंतर सुश्मिताने शेअर केले फोटो;…म्हणाली हे आहे ते फक्त अपार प्रेम

सुष्मिता सेनने ललित मोदींसोबत असलेले नातेसंबंध सगळ्यासमोर आल्यानंतर तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.अभिनेत्री सष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर तिच्या मुली रेने आणि अलीशाबरोबरचा फोटो शेअर करत सांगितले आहे, त्या खूप खूष आहेत, आणि तिने असंही लिहिले आहे की, मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातील आनंदी क्षणाबरोबर आहे, माझं लग्न झालं नाही, त्यामुळं कोणतीही अंगठी नाही, फक्त अपार प्रेम आहे.

Sushmita Sen: ये इश्क है मंजुर? ललित मोदींच्या फ़ोटोज नंतर सुश्मिताने शेअर केले फोटो;...म्हणाली हे आहे ते फक्त अपार प्रेम
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 6:58 PM

मुंबईः सध्या ललित मोदी (Lalit Modi) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या नातेसंबंधावरुन जोरदार चर्चा सुरू आहे, 14 जुलै रोजी ललित मोदीने सुष्मिता सेनबरोबरच सुट्टीतील खूप सारे फोटो शेअर करत सांगितले की, ती दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर माध्यमांतूनही फक्त या दोघांचीच चर्चा होऊ लागली आहे. सुष्मिताचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेका हा धक्का पचवणं अवघड झालं आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी इटलीतील एका सुंदर ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ललित मोदीने लंडनला गेल्यानंतर सुष्मिता सेनबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले होते.

त्याने पोस्ट करून 20 तास झाल्यानंतर सुष्मिता सेनने त्याच्या त्या पोस्टला रिअॅक्शन म्हणून आपलेही फोटो तिने शेअर केले आहेत.

माझं लग्न झालं नाही…

सुष्मिता सेनने ललित मोदींसोबत असलेले नातेसंबंध सगळ्यासमोर आल्यानंतर तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर तिच्या मुली रेने आणि अलीशाबरोबरचा फोटो शेअर करत सांगितले आहे, त्या खूप खूष आहेत, आणि तिने असंही लिहिले आहे की, मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातील आनंदी क्षणाबरोबर आहे, माझं लग्न झालं नाही, त्यामुळं कोणतीही अंगठी नाही, फक्त अपार प्रेम आहे.

एका हातात डायमंडची रिंगही

सुष्मिता आणि ललित मोदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की, या दोघांनी कुणालाही न सांगताच लग्न केले आहे. व्हायरल झालेल्या एका फोटोत सुष्मिताच्या एका हातात डायमंडची रिंगही दिसत होती. त्यामुळे अनेकांनी तिने ललित मोदीसोबत लग्न केलं असच समजण्यात आले. त्यानंत ललित मोदीने ट्विटस प्रतिक्रिया देत म्हटले होते की, लग्न वगैरे काही नाही, तर ती दोघंही एकमेकांना फक्त डेट करत आहेत, लग्न किंवा एंगेजमेंट असं काहीही झालं नाही.

दोघंही रोमँटीक मूडमध्ये

ललित मोदीने सुष्मिता सेनबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, त्या सगळ्या फोटोमध्ये ती दोघंही एका रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत, आणि त्यावर ललित मोदीने ट्विट केले होते की, कुंटुंबासोबत एक दूरवरची आनंदी सहलीवरून मी पुन्हा लंडनला आलो आहे, सगळ्यात सुंदर असणारी माझी पार्टनर सुष्मिता सेनबरोबर आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरूवात करत आहे.

…त्यांच्या आनंदासाठी एकांत द्या

सुष्मिता सेनेच्या कुटुंबीयांनी या नातेसंबंधाबाबत अजूनपर्यंत त्यांनी काही बोलले नाहीत, मात्र सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन म्हणाला की, मला ही या नातेसंबंधाबद्दल माहिती नव्हते मात्र मला धक्का बसला. तर सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने सांगितले की, त्या दोघांना त्यांच्या आनंदासाठी एकांत द्या, त्यांच्या सुखात तुम्ही आनंद साजरा करा, तर दुसरीकडे ललित मोदीचा मुलगा रुचिर मोदीने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रियी देण्यास नकार दिला आहे. त्याने सांगितले की हा आमचा कौंटुबीक प्रश्न आहे आणि त्याविषयी आपण काही बोलू इच्छित नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.