सुष्मिता सेन हिने स्वतःला दिलं महागडं गिफ्ट; किंमत ऐकून बसेल धक्का
स्वतःला गिफ्ट देण्यासाठी सुष्मिता सेन हिने मोजले कोट्यवधी रुपये; अभिनेत्रीचं गिफ्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, सोशल मीडियावर गिफ्टचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली, तरी सुष्मिता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य करत आहे. ‘आर्या’ या वेब सीरिजमुळे चर्चेत असलेली सुष्मिता आता एका महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आली आहे. सुष्मिताने स्वतःसाठी एक महागडं गिफ्ट घेतलं आहे आणि या गिफ्टसाठी अभिनेत्रीने कोट्यवधी रुपये मोजले आहे. सुष्मिताने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसाबोत आनंद शेअर केला आहे. स्वतःला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे सुष्मिता तुफान चर्चेत आहे. (Sushmita Sen New Car)
सुष्मिताने स्वतःला एक महागडी गाडी गिफ्ट केली आहे. सुष्मिताने मर्सिडीज GLE 53 AMG गाडी खरेदी केली आहे. सुष्मिताच्या या काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीची किंमत सुमारे १.९२ कोटी रुपये आहे. सुष्मिताने नव्या गाडीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘… आणि ज्या महिलेला ड्राइव्ह करायला आवडतं, ती स्वतःला शक्तिशाली आणि सुंदर गिफ्ट देते.’ असं लिहिलं आहे. सुष्मिताच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र सुष्मिता आणि तिच्या महागड्या गाडीची चर्चा आहे.
View this post on Instagram
सुष्मिता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुष्मिता आणि ललित मोदी दोघांचे रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. ललित मोदी याने सुष्मिता हिच्यासोबत काही फोटो पोस्ट करत एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.
सुष्मिता सेन आणि ललित मोदी ललित मोदी पूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत सुष्मिताचं नाव जोडण्यात आलं. सुष्मिता कायम तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली. अनेकांसोबत सुष्मिता रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगण्यात आलं, पण अभिनेत्री कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही अभिनेत्री एकटी आयुष्य जगते.