Sushmita Sen : 18 वर्ष जुन्या साडीत सुष्मिता दिसते सुंदर, दिवाळी पार्टीत अभिनेत्रीच्या लूकची चर्चा

Sushmita Sen : सुष्मिता सेन हिने दिवाळीत नेसली 18 वर्ष जुनी साडी... बॉयफ्रेंड आणि लेकीसोबत दिवाळी पार्टीत अभिनेत्रीची रॉयल एन्ट्री... साडीत फुललं सुष्मिता हिचं सौंदर्य..., सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल..., चाहते कमेंट करत म्हणाले....

Sushmita Sen : 18 वर्ष जुन्या साडीत सुष्मिता दिसते सुंदर, दिवाळी पार्टीत अभिनेत्रीच्या लूकची चर्चा
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 12:49 PM

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : देशात प्रत्येक जण दिवाळी सणाचा आनंद लुटत आहे. सर्व-समान्यांसह सेलिब्रिटी देखील दिवाळी सण मोठ्या थाटात साजरा करत आहेत. सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी दिवाळी पार्टीसाठी जाताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या दिवाळी पार्टीत पोहोचली. सुष्मिता एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिवाळी पार्टीत स्पॉट झाली. यावेळी अभिनेत्रीची मुलगी रेनी सेन देखील होती. रेनी तिच्या नवीन लूकमध्ये खूपच वेगळी दिसत होती. सोशल मीडियावर तिघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिल्पा शेट्टी हिच्या दिवाळी पार्टीमध्ये सुष्मिता 18 वर्ष जुनी साडी नेसून आल्याची चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, 2005 मध्ये दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये सुष्मिता अभिनेता संजय दत्त याच्यासोबत पोहोचली होती.

‘कॉफी विथ करण’मध्ये सुश्मिता हिने नेसलेली साडी पुन्हा तब्बल 18 वर्षांनंतर शिल्पा शेट्टी हिच्या दिवाळी पार्टीमध्ये नेसल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता सेन आणि तिच्या साडीची चर्चा रंगली आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साडीतील अभिनेत्रीचा हटके लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. बॉयफ्रेंड रोहमन याच्यासोबत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सुष्मिता आणि रोहमन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान अभिनेत्रीच्या नावाची चर्चा उद्योजक ललित मोदी याच्यासोबत झाली. पण हे नातं फार काळ टिकलं नाही…

तेव्हा रोहमन आणि सुष्मिता यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण आता दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. सुष्मिता आणि रोहमन यांच्यामध्ये जवळपास 16 वर्षांचं अंतर आहे. सुष्मिता हिचं वय 47 वर्ष आहे तर, अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचं वय 31 वर्ष आहे. सध्या सर्वत्र सुष्मिता आणि रोहमन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सुष्मिता हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘आर्या 3’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. चाहत्यांनी देखील ‘आर्या’ सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेम दिलं. सुष्मिता हिच्या ‘ताली’ वेब सीरिजला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सुष्मिता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.