मुंबई | 8 जानेवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान याच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चर्चा सुरु आहे. आमिर खान याची मुलगी आयरा खान हिचं लग्न असल्यामुळे संपूर्ण खान कुटुंब उदयपूर याठिकाणी आहे. सध्या आयरा हिच्या लग्नाआधीच्या विधी सुरु आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान – नुपूर शिखरे यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. नुपूर शिखरे अभिनेता आमिर खान याच्या लेकीसोबत लग्न करत असल्यामुळे शिखरे कुटुंबाबद्दल देखील अनेक चर्चा रंगत आहेत. सध्या नुरुप शिखरे याची आई आणि आयरा खान हिच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दल चर्चा रंगली आहे.
नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना नुपूर शिखरे याने ट्रेन केलं आहे…. ही गोष्ट अनेकांना माहिती आहे. पण नुपूर शिखरे याच्या आईचं बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत देखील खास कनेक्शन आहे. सध्या सर्वत्र आयरा हिच्या सासूबाई आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
नुपूर शिखरे याच्या आईचं नाव प्रितम शिखरे असं आहे. सुष्मिता, प्रितम शिखरे यांना गुरु माँ म्हणून हाक मारते. सांगायचं झालं तर, प्रितम शिखरे एक प्रसिद्ध कथक नृत्यांगना आहेत. प्रितम शिखरे यांनी सुष्मिता हिला कथक नृत्य शिकवलं आहे. एवढंच नाही तर, इंटरनॅशनल डान्स डेच्या मुहूर्तावर सुष्मिता हिने प्रितम शिखरे यांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. शिवाय त्यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा दिल्या होत्या.
नुपूर याच्या आईने सुष्मिता हिचे लेक रेने हिला देखील कथक नृत्य शिकवलं आहे. रेने लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सांगायचं झालं तर, प्रितम शिखरे आणि सुष्मिता सेन यांच्यात गुरु शिष्याचं नातं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रितम शिखरे यांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्ना आधीच्या विधींची सुरुवात 7 जानेवारी पासून झाली आहे. 8 जानेवारी रोजी म्हणजे आज दोघांचा विवाह पार पडणार आहे. दोघांच्या लग्नात अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी राहणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. लग्नानंतर 13 जानेवारी रोजी मुंबई येथे ग्रँड रिसेप्शन होणार आहे. आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शनसाठी देखील अनेक बॉलिवूड उपस्थितीत राहणार आहेत.