Sushmita Sen | चक्क ‘या’ व्यक्तीला मिठी मारताना दिसली सुष्मिता सेन, ललित मोदी यांना धोका देत आहे अभिनेत्री? चर्चांना उधाण
अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच सुष्मिता सेन हिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये सुष्मिता सेन ही एका व्यक्तीला थेट मिठी मारताना दिसत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना गेल्या काही वर्षांपासून सुष्मिता सेन ही डेट करत आहे. मालदिवमध्ये ललित मोदी आणि सुष्मिता सेन हे लग्न करणार असल्याची चर्चा देखील काही दिवसांपूर्वी जोरदार रंगली होती. ललित मोदी (Lalit Modi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुष्मिता सेन हिच्यासोबत असलेले नाते जाहिर केले होते. यासोबतच त्यांनी काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. या फोटोमध्ये (Photo) सुष्मिता सेन ही अत्यंत खास अंदाजामध्ये दिसत होती. मात्र, ललित मोदी यांच्या पोस्टनंतर अनेकांना धक्का देखील बसला.
सुष्मिता सेन हिचा एक व्हिडीओ सध्या तूफान सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन ही एका व्यक्तीची गळा भेट घेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी थेट ललित मोदीला सुष्मिता सेन ही धोका देत असल्याचे थेट म्हटले आहे. मात्र, हा व्हिडीओ आर्या 3 चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे सांगितले जात आहे.
सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून आर्या 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यक्त होती. शेवटी आता नुकताच सुष्मिता सेन हिने आर्या 3 चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर धमाल करण्यात आली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन ही को स्टार सिकंदर खेर याची गळाभेट घेताना दिसत आहे.
सुष्मिता सेन आणि सिकंदर खेर यांच्या भेटीचा व्हिडीओ पाहून चाहते फिरकी घेताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा व्हिडीओ पाहून ललित मोदी यांना नक्कीच जलन होईल. दुसऱ्याने लिहिले की, ही सुष्मिता सेन ललित मोदी यांना धोखा देताना मला तर दिसत आहे. अजून एकाने लिहिले की, हा व्हिडीओतर मला आवडला.
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, सुष्मिता सेन आणि सिकंदर खेर यांचा हा व्हिडीओ पाहून नक्कीच ललित मोदी यांची झोप उडाली असेल. आता सुष्मिता सेन हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते तूफान कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांना सुष्मिता सेन हिचा हा व्हिडीओ आवडलाय. या व्हिडीओमुळे सुष्मिता चर्चेत आहे.