‘हृतिक रोशन नाही तर, कोणीच नाही….’, काळ उलटल्यानंतर सुझान हिचे बदलले विचार आणि नाती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण…

हृतिक रोशन याच्या शिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचारही न करणाऱ्या सुझान खान हिने का सोडली पहिल्या पतीची साथ? व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

'हृतिक रोशन नाही तर, कोणीच नाही....', काळ उलटल्यानंतर सुझान हिचे बदलले विचार आणि नाती, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण...
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 10:16 AM

मुंबई | आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो… असं आपण अनेकदा वाईट काळ आल्यानंतर ऐकतो. आयुष्यात वाईट वेळ खुप काही सांगून जाते. ज्यामुळे प्रत्येकाचे विचार तर बदलतात पण नात्यांचं महत्त्व आणि माणसं कळत जातत. अशा गोष्टी फक्त सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यात घडत नाहीत, तर सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील घडत असतात. अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान यांच्या नात्याबद्दल सर्व चाहत्यांना माहिती आहे. एक काळ असा होता जेव्हा सुझान आणि हृतिक यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. सुझान अभिनेत्री नसली तरी देखील हृतिक याची पहिली पत्नी म्हणून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण जेव्हा दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. नात्यात आलेल्या चढ – उतारामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला..

आज सुझान आणि हृतिक एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. पण त्यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. घटस्फोट दिल्यानंतर दोघे देखील त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आता हृतिक गर्लफ्रेंड सबा आझाद हिला डेट करत आहे, तर सुझान खान अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे.

पण एक वेळ अशी होती जेव्हा सुझान हृतिक याच्याशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचार देखील करु शकत नव्हती. सध्या सुझान हिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुझान पहिला पती हृतिक रोशन याच्याबद्दल बोलताना दिसत आहे. सुझान म्हणते, ‘आयुष्यात जर हृतिक पासून वेगळं व्हायची आली, तर मी कधीही दुसऱ्या कोणाचा विचार करु शकत नाही.’

सुझान पुढे म्हणाली, ‘मला नाही वाटत हृतिक शिवाय मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाचा विचार करु शकते. हृतिक माझ्या फार जवळ आहे…’ सध्या सर्वत्र सुझान खान हिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे, हृतिक आणि सुझान आज विभक्त जरी झाले असले तर, मुलांचा एकत्र सांभाळ करतात.

कंगना रनौत हिच्यमुळे झाला हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट?

‘क्रिश’ सिनेमानंतर कंगना आणि हृतिक यांच्यात अफेअर सुरु झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. कंगनाने दिलेल्या माहितीनुसार, हृतिक पत्नी सुझान हिला घटस्फोट देवून कंगनासोबत लग्न करणार होता. पण हृतिक याने माझी फसवणूक केल्याचा दावा देखील कंगानाने केला होता. त्यानंतर हृतिक आणि कंगना यांच्यात असलेल्या भांडणाची चर्चा सर्वत्र रंगू लागली… आजही सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये हृतिक आणि कंगना यांच्या प्रेम संबंधांची चर्चा रंगलेली असते.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.