Kareena Kapoor | करीनाच्या वागणुकीवर टीका होताच हृतिकच्या पूर्व पत्नीने वाजवली टाळी; वाचा नेमकं काय घडलं?

करीनाची ही वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले होते. ‘हा खूपच उद्धटपणा आहे. तिला फक्त सेल्फी काढायचा होता. पण या बॉलिवूड कलाकारांना एवढा कसला ॲटिट्यूड आहे हे मला कधीच समजलं नाही. ते फक्त चित्रपटात चांगल्या व्यक्तीची भूमिका साकारतात, पण त्यांची रिॲलिटी ही आहे’, असं एकाने लिहिलं होतं.

Kareena Kapoor | करीनाच्या वागणुकीवर टीका होताच हृतिकच्या पूर्व पत्नीने वाजवली टाळी; वाचा नेमकं काय घडलं?
Sussane Khan and Kareena Kapoor KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 1:02 PM

मुंबई | 31 जुलै 2023 : ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत करीना कपूरच्या वागणुकीबद्दल टिप्पणी केली होती. करीनाने तिच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष केलं, असं ते म्हणाले. नारायण मूर्ती ज्या विमानाने प्रवास करत होते, त्याच विमानातून करीनासुद्धा प्रवास करत होती. “माझ्या बाजूच्या सीटवर करीना कपूर बसली होती. विमानातील अनेकजण तिच्याजवळ येऊन तिला हॅलो म्हणत होते. मात्र करीना त्यांच्याकडे वळूनही पाहत नव्हती. ती त्यांना कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती. हे पाहून मी थक्क झालो. माझ्याजवळ जे लोक आले, त्यांच्यासाठी मी उभा राहिलो, त्यांच्याशी मी अर्धा-एक मिनिट बोललो. त्या चाहत्यांची फक्त एवढीच अपेक्षा होती”, असं त्यांनी सांगितलं. नारायण मूर्तींच्या या व्हिडीओवर आता अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सुझानने नारायण मूर्ती यांचं कौतुक केलं आहे. एका वृत्तवाहिनीने नारायण मूर्तींच्या मुलाखतीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. याच व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये सुझानने लिहिलं, ‘बरोबर बोललात मिस्टर मूर्ती.’ यासोबतच तिने टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत. करीनाबद्दलच्या व्हिडीओवर सुझानची कमेंट वाचून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशन आणि करीना कपूरच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. ‘यादें’ आणि ‘मै प्रेम की दिवानी हूँ’ या चित्रपटांमध्येही दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. हृतिक आणि करीनाची जोडी त्यावेळी हिट होती. 2002 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली होती, “त्याच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होतील, याची मला अधिक चिंता आहे. माझ्यासाठी हा व्यावसायिक फटका आहे. आज हृतिकसोबत नाव जोडलं गेलंय, उद्या आणखी कोणी असेल. जोपर्यंत मला सत्य माहीत आहे, तोपर्यंत मी ठीक आहे. हृतिकसोबत लिंकअपच्या बातम्यांमधील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या मागे-मागे धावण्यासाठी मी माझं करिअरसुद्धा सोडण्यास तयार आहे, असं म्हटलं गेलंय. माझं करिअर मी कोणत्याही पुरुषासाठी सोडू शकत नाही, कधीच नाही.”

हे सुद्धा वाचा

दोन महिन्यांपूर्वी करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती एअरपोर्टवर एका चाहतीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतेय. करीनाची ही वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले होते. ‘हा खूपच उद्धटपणा आहे. तिला फक्त सेल्फी काढायचा होता. पण या बॉलिवूड कलाकारांना एवढा कसला ॲटिट्यूड आहे हे मला कधीच समजलं नाही. ते फक्त चित्रपटात चांगल्या व्यक्तीची भूमिका साकारतात, पण त्यांची रिॲलिटी ही आहे’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘अशा लोकांमागे सेल्फीसाठी धावणं हा खूपच मूर्खपणा आहे. ही लोकं खरे हिरो नाहीत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.