Marathi News Entertainment Swades actress Gayatri Joshi who worked with Shah Rukh Khan left Bollywood to marry one of Indias richest men
‘स्वदेस’मधील अभिनेत्री आठवतेय का? भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीशी लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीला केला रामराम!
2004 मध्ये तिने आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. गायत्रीच्या परिपक्व अभिनयाची त्यांनी प्रशंसा केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते.
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करण्याचं जसं बहुतेक तरुणींचं स्वप्न असतं, तसंच स्वप्नवत पदार्पण अभिनेत्री गायत्री जोशीचं झालं होतं. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केलं. मात्र या पहिल्या चित्रपटानंतर गायत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाली. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर तिने भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीशी लग्न केलं.
2 / 5
गायत्रीचा जन्म 1997 मध्ये नागपुरात झाला. तिने मुंबईत कॉलेजमध्ये शिकताना मॉडेलिंगला सुरुवात केली होती. गोदरेज, एलजी, पाँड्स, बॉम्बे डाईंग, सनसिल्क आणि फिलिप्स अशा नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तिने काम केलं. तिने हुंडाईच्या जाहिरातीत पहिल्यांदा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केला होता.
3 / 5
1999 मध्ये गायत्रीने मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती पाच फायनिस्टपैकी एक होती. त्याच्या पुढच्या वर्षी तिला मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब मिळाला. तिने जपानमध्ये मिस इंटरनॅशनल 2000 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
4 / 5
2004 मध्ये तिने आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. गायत्रीच्या परिपक्व अभिनयाची त्यांनी प्रशंसा केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते. मात्र त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली.
5 / 5
स्वदेस हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही महिन्यांतच गायत्रीने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे प्रवर्तक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीत काम करणं सोडून दिलं. विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ही जवळपास 22,780 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत असलेल्या 100 जणांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. गायत्रीने लग्नानंतर वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलंय. ती सध्या पती आणि दोन मुलांसह मुंबईत राहते.