‘चित्रपटगृहात पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर…’; स्वप्नील जोशीचं मराठी सिनेमांबद्दल मोठं वक्तव्य
मराठी सिनेमांबद्दल अभिनेता स्वप्नील जोशीचं मोठं वक्तव्य; अभिनेता म्हणतो, 'प्रेक्षक मराठी नाटकांवर प्रेम करतात पण...'
मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी कायम त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. एवढंच नाही, तर अभिनेता अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील स्पष्ट भूमिका मांडतो. आता देखील अभिनेत्याने मराठी सिनेमे आणि नाटकांबद्दल मोठा खुलासा केला आहे. मराठी नाटक अजरामर असून, मराठी सिनेमा देखील मोठा होत आहे आणि त्यामागे प्रेक्षकांनी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन स्नप्नील जोशीने ‘मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन २०२३’ मध्ये केलं आहे.
मराठी नाटक आणि सिनेमांबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला, ‘मराठी नाटक, मालिका, सिनेमांवर प्रेम करा. पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर घरुन जेवून जा. पण मराठी सिनेमे सिनेमागृहातच जावून बघा. मराठी नाटकांच्या मागे आपण ठामपणे उभे राहतोच, पण मालिकांवर देखील प्रेम करा. मराठी मालिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहा.’
View this post on Instagram
अभिनेता पुढे म्हणाला, ‘नागरिकांचा रक्तगट हा ए पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह असा असतो आणि मराठी माणसाचा रक्तगट नाटक आहे असं मला वाटतं. आपल्या संस्कृतीत, सभ्यतेत नाटक आहे. म्हणून नाटक अजरामर असून चिरतरुण आहे. आता मराठी सिनेमा देखील मोठा होत आहे. प्रत्येक सिनेमात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे.’ असं देखील स्वप्नील जोशी म्हणाला.
स्वप्नील लवकरच ‘वाळवी’ सिनेमातून प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे. सिनेमा १३ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी परेश मोकाशी यांच्या खांद्यावर असून सिनेमाचं लेखण मधुगंधा कुलकर्णी यांनी केलं आहे. सध्या स्वप्नीलच्या आगामी सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
स्वप्नील जोशीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्याला नव्या सिनेमात आणि नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील स्वप्नीलचा बोलबाला असतो. स्वप्नील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.