‘जहांगीर’ च्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करने साधला निशाणा, ट्रोलर्सना सांगितले “तुम्ही सर्व गाढव आहात”

करीना आणि स्वरा वीरे दी वेडिंग(Veere Di Wedding) या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या दोघींची मैत्री खूप घट्ट झाली. स्वरा 2018 नंतर कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसली नाही. आजकाल ती आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत आहे.

'जहांगीर' च्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करने साधला निशाणा, ट्रोलर्सना सांगितले तुम्ही सर्व गाढव आहात
'जहांगीर' च्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करने साधला निशाणा
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:26 PM

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)च्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यात आले आहे. आता या नावाबाबत सोशल मीडियावर चर्चा तीव्र रंगली आहे. हे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते या जोडीला ट्रोल करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. युजर्स सवाल करीत आहेत की करीनाने तिच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे, त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर कोणत्या कारणाने ठेवले आहे. अशा परिस्थितीत, आता हे संपूर्ण प्रकरण पाहता, करीना कपूर खानची जुनी मैत्रीण आणि कोस्टार प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhasker)ने यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. (Swara Bhaskar aims at trolls trolling under the name Jahangir)

काय म्हणाली स्वरा?

करीनाच्या लहान मुलाच्या नावाबद्दल स्वरा भास्करने एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये, अभिनेत्रीने वापरकर्त्यांना कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर ट्विटमध्ये तिने या सर्व ट्रोलर्सना गाढव म्हटले आहे. अभिनेत्री लिहिते, “एका जोडप्याने त्यांच्या मुलांची नावे ठेवली आहेत, आणि ते जोडपे तुम्ही नाही – पण नावे काय आहेत आणि का आहेत यावर तुमचे मत आहे आणि तुमच्या मनात हा प्रश्न आहे; ज्यामुळे तुमच्या भावना दुखावतात …. तर तुम्ही या जगातील सर्वात मोठ्या गाढवांपैकी एक आहात! ” या ट्विटच्या शेवटी अभिनेत्रीने करीनाच्या मुलाचे नाव जहांगीर लिहिले आहे. अभिनेत्रीचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे अनेक युजर्सनी अभिनेत्रीला आपली उत्तरेही दिली आहेत.

युजर्सकडून स्वराही झाली ट्रोल

काही युजर्सनी येथे स्वराला ट्रोल केले आणि म्हटले की “तैमूर, जहांगीर आणि येणाऱ्या औरंगजेबाच्या आयाला भेटा”. अन्य एका युजर्सने लिहिले की “तू तुझ्या काळात ही गोष्ट का विसरतेस, कोणती गोष्ट तुझ्या फायद्याची असते त्यात तू उडी घेते आणि जिथे तुला फायदा होत नाही तिथे गप्प घरी बसते. बर्‍याच युजर्सनी आरोप केला की अभिनेत्री केवळ तिच्या प्रसिद्धीसाठी अशा मुद्द्यांवर आपली विधाने देते. जिथे तिला चर्चेमध्ये राहण्याची संधी मिळते.

वीरे दी वेडिंग चित्रपटात एकत्र झळकल्या होत्या स्वरा आणि करीना

करीना आणि स्वरा वीरे दी वेडिंग(Veere Di Wedding) या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या दोघींची मैत्री खूप घट्ट झाली. स्वरा 2018 नंतर कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसली नाही. आजकाल ती आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत आहे. दुसरीकडे, करीना कपूर खान लवकरच तिचा पुढील चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये आमिर खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Swara Bhaskar aims at trolls trolling under the name Jahangir)

इतर बातम्या

सोलापुरात सहाय्यक पोलीस आयुक्तांना हार्ट अटॅक, जीमला गेले, आराम केला, नेमकं काय घडलं?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.