Swara Bhasker | आंदोलनात बहरलं प्रेम; स्वरा भास्कर – फहाद अहमदची हटके लव्हस्टोरी

स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये स्वराने तिची लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली आहे.

Swara Bhasker | आंदोलनात बहरलं प्रेम; स्वरा भास्कर - फहाद अहमदची हटके लव्हस्टोरी
Swara and FahadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:38 AM

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केलं आहे. या लग्नाचा खुलासा तिने जवळपास 40 दिवसांनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत केला. या दोघांची पहिली भेट, मैत्री, प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आहे. स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये स्वराने तिची लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली आहे.

स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 2019 आणि 2020 मधील आंदोलनांची झलक पहायला मिळतेय. या आंदोलनातच दोघांच्या कहाणीची सुरुवात झाली. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओत पुढे दाखवलं गेलं की गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली. व्हिडीओमध्ये दोघं कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.

कोण आहे फहाद अहमद?

फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. 2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे.

आंदोलनादरम्यान सुरू झालेली कहाणी एका मांजरीच्या माध्यमातून पुढे सरकली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढच्या महिन्यात स्वरा आणि फहाद रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचंही कळतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.