Swara Bhasker | स्वरा भास्करची फिल्मी सुहागरात; अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकतीच तिने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केलं. स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. तर मार्च महिन्यात विधीवत या दोघांचं लग्न पार पडणार आहे. स्वरा भास्करच्या या लग्नावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पहायल्या मिळाल्या आहेत. यादरम्यान तिने तिच्या इन्स्टा […]
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकतीच तिने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केलं. स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. तर मार्च महिन्यात विधीवत या दोघांचं लग्न पार पडणार आहे. स्वरा भास्करच्या या लग्नावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पहायल्या मिळाल्या आहेत. यादरम्यान तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये स्वरा आणि फहादच्या सुहागरातसाठी सजवलेली बेडरूम पहायला मिळतेय.
स्वराने पोस्ट केले फोटो
स्वराने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये फुलांनी सजवलेला बेड पहायला मिळतोय. या फोटोंसह तिने लिहिलं, ‘माझी सुहागरात फिल्मी व्हावी याची संपूर्ण काळजी आईने घेतली आहे.’ याशिवाय तिने एक व्हिडीओसुद्धा रि-शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेचा आवाज ऐकू येतोय. ती महिला स्वराला शुभेच्छा देताना विचारतेय की ‘हे सगळं काय सुरू आहे?’ या व्हिडीओतही बेडरुमची झलक पहायला मिळते.
स्वराने आणखी एक सेल्फीसुद्धा पोस्ट केला आहे. यामध्ये एक तरुणी सेल्फी काढतेय आणि तिच्या मागे स्वरा आणि फहाद उभे असल्याचं दिसतंय. स्वराने 6 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ शेअर करत फहादसोबतचं नातं जगजाहीर केलं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर 40 दिवसांनी तिने लग्नाचा खुलासा केला.
लग्नानंतरच्या एका ट्विटमध्ये स्वराने स्पेशल मॅरेज ॲक्टचा उल्लेख केला. ‘कमीत कमी हे अस्तित्त्वात आहे आणि प्रेम करण्याची संधी देतोय… प्रेमाचा अधिकार, आपला जीवनसाधी निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, या एजन्सीचा अधिकार हा विशेषाधिक नसावा’, असं तिने लिहिलं होतं.
कोण आहे फहाद अहमद?
फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. 2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे.