‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या टीझरवरून भडकली अभिनेत्री; रणदीप हुडाला म्हणाली ‘काहीही दाखवलंय’
स्वस्तिकाच्या या ट्विट्सवर अद्याप रणदीपकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीपसोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मुंबई : चित्रपटांवरून सुरू झालेला वाद काही केल्या संपत नाहीये. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात मोठा वाद झाला. हा वाद कोर्टापर्यंतही पोहोचला होता. आता अभिनेता रणदीप हुडाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या टीझरवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. वीर सावरकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये रणदीपनेच मुख्य भूमिका साकारली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याने सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये टॅगलाइन देण्यात आले आहेत. यातील एका टॅगलाइनमध्ये असा दावा केला आहे की सावरकर यांनी भगत सिंग, सुभाषचंद्र बोस आणि खुदीराम बोस यांसारख्या स्वातंत्र्यसेनानींना प्रेरित केलं होतं. यावरूनच आता अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने आक्षेप घेतला आहे.
अशा प्रकारचे दावे करून चित्रपटाची प्रसिद्धी करण्याच्या विरोधात असल्याची ठाम भूमिका स्वस्तिकाने मांडली. स्वस्तिकाने पाताल लोक आणि कला यांमध्ये काम केलं आहे. रणदीपच्या चित्रपटाविषयी ट्विट करत तिने लिहिलं, ‘खुदीराम बोस यांचं वयाच्या 18 व्या वर्षीच निधन झालं होतं. त्याच्याआधीच त्यांना स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात आलं होतं का? आणि नेताजी यासाठी नेताजी बनले का कारण त्यांना कोणापासून प्रेरणा मिळाली होती? भगत सिंग यांचा इतिहास आपल्याला आधीपासूनच माहीत आहे. अशा प्रेरणादायी कथा जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून शोधून काढल्या जात आहेत?’
View this post on Instagram
दुसऱ्या ट्विटमध्ये स्वस्तिकाने लिहिलं, ‘खुदीराम यांच्यापेक्षा सावरकर हे सहा वर्षांनी मोठे होते. खुदीराम यांचं निधन 1908 मध्ये झालं होतं. सावरकर यांनी 1857 वरील त्यांचं पुस्तक 1909 मध्ये प्रकाशित केलं होतं. त्यावेळी ते लंडनमध्ये विद्यार्थी होते. मी चुकत असेन तर मला सांगा.’
Khudiram Bose died at the age of 18. Someone inspired him even before that to join the freedom movement? And Netaji became Netaji because he was inspired by someone ? And Bhagat Singh’s history we all know already. From where on earth are these inspiring stories popping up ?
— Swastika Mukherjee (@swastika24) May 29, 2023
Savarkar was six years older than Khudiram. Khudiram died in 1908. Savarkar published his book on 1857 in 1909. He was a student then in London and was yet to be any serious militant. Anybody, correct me if I’m wrong. Thank you @devarsighosh for stating the obvious.
— Swastika Mukherjee (@swastika24) May 29, 2023
‘मला वाटतं की आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा किंवा आपल्या देशासाठी लढलेल्या कोणाचाही अपमान किंवा अनादर कोणी करू इच्छित नाही. माझा असा कोणताही हेतू नक्कीच नाही. पण चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेली ही गोष्ट मला मान्य नाही. एखाद्या व्यक्तीला निवडून त्याला इतरांपेक्षा वरच्या स्थानावर ठेवणं, गरजेचं नाही’, असंही तिने म्हटलंय.
I don’t think anyone wants to dishonour or disrespect our freedom fighters or anyone who fought for our country. I definitely have no such intention. But I do not agree to this selling pitch of films. Putting chosen ones on a higher pedestal. Not required.
— Swastika Mukherjee (@swastika24) May 29, 2023
स्वस्तिकाच्या या ट्विट्सवर अद्याप रणदीपकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीपसोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.