‘या’ कारणामुळे दिव्या खोसलाने हटवलं पतीचं आडनाव; भूषण कुमारच्या टीमकडून स्पष्टीकरण

टी-सीरिजचे भूषण कुमार आणि त्यांची पत्नी दिव्या खोसला कुमार यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. यामागचं कारण म्हणजे दिव्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पतीचं आडनाव हटवलं आहे. या चर्चांवर आता भूषण कुमार यांच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

'या' कारणामुळे दिव्या खोसलाने हटवलं पतीचं आडनाव; भूषण कुमारच्या टीमकडून स्पष्टीकरण
Bhushan Kumar and Divya KhoslaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 3:20 PM

मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती भूषण कुमारचं आडनाव हटवल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर तिने इन्स्टाग्रामवरून टी-सीरिजला अनफॉलोसुद्धा केलंय. दिव्या आणि तिचा पती भूषण कुमार यांच्यात काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. अशातच भूषण कुमार यांच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

‘झूम’ या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भूषण कुमारच्या टीमने घटस्फोटाच्या चर्चांना निराधार आणि चुकीचं म्हटलंय. टी-सीरिजच्या प्रवक्त्यांनी याविषयी म्हटलंय की दिव्या खोसलाने तिच्या ज्योतिषी मान्यतांमुळे पतीचं आडनाव हटवलं आहे. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, ज्याचा लोकांनी आदर करायला हवा. तिने तिच्या आडनावाच्या आधी अतिरिक्त ‘एस’सुद्धा जोडलं आहे, जो तिच्या ज्योतिषी विश्वासांनुसार घेतलेला आणखी एक निर्णय आहे.

हे सुद्धा वाचा

भूषण कुमार यांच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतरही घटस्फोटाच्या चर्चा शमण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेकांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे की तिने जरी ज्योतिषाच्या कारणामुळे पतीचं आडनाव हटवलं असेल तरी टी-सीरिजच्या अकाऊंटला अनफॉलो का केलं? दिव्या आधी तिचं पूर्ण नाव दिव्या खोसला कुमार असं लिहायची. आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फक्त दिव्या खोसला असं नाव पहायला मिळतयं. तिने तिच्या पतीचं आडनाव हटवून तिच्या स्वत:च्या आडनावात अतिरिक्त ‘S’ जोडला आहे. यामुळे तिच्या प्रोफाइलवर तिचं नाव ‘Divya Khossla’ असं पहायला मिळतंय.

दिव्या आणि भूषण यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. दिव्या 36 वर्षांची असून भूषण 46 वर्षांचा आहे. या दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. भूषण कुमार हा टी-सीरिज म्युझिक आणि फिल्म प्रॉडक्शन कंपनीचा अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. दिव्या आणि भूषणने 13 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं होतं. या दोघांची भेट 2004 मध्ये झाली होती. त्यावेळी दिव्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.