‘T Series’चे मालक बनण्यापूर्वी ज्यूसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार, गोळ्या मारून झाली होती हत्या!

आजही लोकप्रिय असणारे दिवंगत गायक आणि टी सीरीज (T Series) कंपनीची स्थापना करणारे गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या संघर्षाची कथा तशी खूप मोठी आहे. भारतातील प्रत्येक घरात टी सीरीजचे नाव पोहचवण्यासाठी गायक गुलशन कुमार यांनी खूप परिश्रम घेतले होते.

‘T Series’चे मालक बनण्यापूर्वी ज्यूसच्या दुकानात काम करायचे गुलशन कुमार, गोळ्या मारून झाली होती हत्या!
गुलशन कुमार
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:49 AM

मुंबई : आजही लोकप्रिय असणारे दिवंगत गायक आणि टी सीरीज (T Series) कंपनीची स्थापना करणारे गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या संघर्षाची कथा तशी खूप मोठी आहे. भारतातील प्रत्येक घरात टी सीरीजचे नाव पोहचवण्यासाठी गायक गुलशन कुमार यांनी खूप परिश्रम घेतले होते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, ही मोठी कंपनी स्थापण्यापूर्वी गुलशन कुमार वडिलांबरोबर एका ज्यूस शॉपमध्ये काम करायचे. गुलशन या कामावर खूष नव्हते, त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. यानंतर गुलशनच्या वडिलांनी दुसरे दुकान उघडले आणि दोघे येथे स्वस्त कॅसेट विकत असत (T Series founder singer Gulshan Kumar works on juice center).

यानंतर गुलशनने आपली स्वतःची कंपनी सुरु केली आणि भक्तीगीते तयार करण्यास सुरुवात केली. गुलशन यांनी आपल्या आवाज आणि आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली. गुलशन यांची अनेक भक्तीगीते लोकप्रिय आहेत, जी आजही सर्वांच्या हृदयात आहेत. गुलशन यांच्या टी सीरिज ब्रँडच्या माध्यमातून अनेकांनी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. संगीत विश्वात आपले मोठे नाव केल्यानंतर गुलशन यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला.

त्यानंतर गुलशन कुमार यांनी 1989 साली ‘लाल दुपट्टा कमला का’ या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय गुलशन यांनी ‘बेवफा सनम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

आजही वैष्णो देवीला असतो भंडारा

गुलशन कुमार यांची देवीवर खूप श्रद्धा होती. त्यांनी वैष्णो देवी मंदिरात भंडारा सुरू केला होता. या मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोफत भोजन देण्यात येत होते. देवी आईला भेटायला आलेला कोणीही व्यक्ती रिकाम्या पोटी परत जाऊ नये, अशी गुलशन यांची इच्छा होती. आजही या ठिकाणी गुलशन कुमार यांच्या नावाने भंडारा चालवला जातो (T Series founder singer Gulshan Kumar works on juice center).

नाव मोठे झाल्यावर उद्भवल्या समस्या

आपल्या मेहनतीने गुलशन कुमार यांनी इतके मोठे नाव कमावले होते. हेच नाव पुढे जाऊन आपल्या जीवासाठी धोकादायक ठरेल याची कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. 12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशन कुमार नेहमीप्रमाणे मंदिरातून घरी जात असताना काही अतिरेक्यांनी गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातच गुलशन यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठी धक्कादायक होती. इतके मोठे व्यक्तिमत्त्व, अशा व्यक्तीवर कोणी खुलेआम गोळीबार करेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

मुलाने स्वीकारली ‘टी सीरीज’ची जबाबदारी

गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भूषण कुमार यांनी लहान वयातच वडिलांचा पदभार स्वीकारला. भूषण यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेली, ही कंपनी तितकीच मेहनत करून आज पुन्हा एकदा उच्च स्तरावर नेऊन ठेवली आहे.

(T Series founder singer Gulshan Kumar works on juice center)

हेही वाचा :

Video | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल

Indian Idol 12 | अरुणिताच्या आवाजाचे फॅन झाले अमित कुमार, शेअर केला किशोर कुमारांचा जुना किस्सा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.