Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यात ‘अशा’ अवस्थेत उभी होती अभिनेत्री, एका व्यक्तीने १० रुपये भीक म्हणून दिले आणि…

'ते १० रुपये आता फ्रेम करुन ठेव...', रस्त्यात उभ्या राहिलेल्या अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव... व्यक्तीने १० रुपये भीक म्हणून दिले आणि... सध्या सर्वत्र अभिनेत्रीला आलेल्या अनुभवाची चर्चा...

रस्त्यात 'अशा' अवस्थेत उभी होती अभिनेत्री, एका व्यक्तीने १० रुपये भीक म्हणून दिले आणि...
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 1:14 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्यावर विश्वास ठेवणं देखील फार कठीण असतं. कलाकारांना येणारे अनुभव, त्यांच्यासमोर उभी राहिलेली कठीण परिस्थिती… इत्यादी गोष्टी सेलिब्रिटी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अभिनेत्री कृतिका देव हिने देखील शुटिंग दरम्यान आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. कृतिका देव सध्या ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सीरिजमध्ये कृतिका हिने श्रीगौरी सावंत यांच्या लहनपणीच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

सीरिजमध्ये कृतिका लहान, भोळी दाखवली आहे. पण ती २८ वर्षांची आहे. पण सीरिजमध्ये कृतिका हिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र ‘ताली’ सीरिजची चर्चा सुरु असून, कृतिका हिच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कृतिका हिने ‘ताली’ सीरिजच्या शुटिंग दरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. जेव्हा कृतिका मुंबईच्या रस्त्यांवर शुटिंग करत होती. तेव्हा एका व्यक्तीने मला किन्नर समजून माझ्या हातात १० रुपये देवून आशीर्वाद दिला. मुंबईत पोहोचल्यानंतर गणेशला भीक मागावं लागेल… हे माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं.’ असं देखील कृतिका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही रियल लोकेशन्सवर शूट करत होतो. अनेक ठिकाणी कॅमेरे लपवण्यात आले होते. तेव्हा मी एकटी होती आणि ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागत होती. तेव्हा एक व्यक्ती आला मला १० रुपये देवून गेला. मी ते क्षण आठवते तर मझ्या अंगावर काटे उभे राहतात. ते अत्यंत वास्तविक दिसत होतं. त्या व्यक्तीला वाटलं मी खरंच भीक मागत आहे…’

‘त्या घटनेनंतर आमच्या डीओपीने मला ते १० रुपये फ्रेम करुन ठेवयला सांगितले. मी अद्याप फ्रेम केलेली नाही, पण ते १० रुपये आजही माझ्याकडे आहेत. ती परिस्थिती स्वतः अनुभवल्यानंतर कळालं की गौरी सावंत आणि त्यांच्या सारख्या लोकांना काय सहन करावं लागत असेल…’ सध्या सर्वत्र कृतिका देव हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

कृतिका हिच्याबद्दल सांगायचं झालं, अभिनेत्री सध्या ‘ताली’ सीरिजमुळे चर्चेत आहे. पण याआधी कृतिका हिने ‘पानीपत’ आणि ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘ताली’ सीरिजमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

कृतिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सीरिज संबंधीत अपडेट देखील अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत होती.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.