भांगेत कुंकू… तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न? लग्नातील Inside फोटो तुफान व्हायरल
Taapsee Pannu- Mathias Boe Wedding : भांगेत कुंकू, सोबत परदेशी पती... बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या लग्नातील Inside फोटो तुफान व्हायरल, अभिनेत्रीने उरकलं आहे गुपचूप लग्न? सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त तापसीच्या लग्नाची चर्चा... अभिनेत्रीने का नाही केली लग्नाची घोषणा...
अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकल्याची देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. पण यावर अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास बोई यांनी 23 मार्च रोजी लग्न केलं आहे. उदयपूर याठिकाणी तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास यांचा विवाह संपन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं असं सांगण्यात येत आहे. लग्नाची चर्चा सुरु असताना, अभिनेत्रीचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत.
आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तापसी आणि मॅथियास यांना रंगपंचमीचा आनंद घेतल्याचं दिसत आहे. पण फोटोमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रीच्या सिंदूरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना, तापसी हिने पतीसोबत पहिल्या होळीचा आनंद घेतल्याची चर्चा रंगत आहे. तापसी आणि मॅथियास यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या मैत्रीणीने होळीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये तापसी, मॅथियास यांच्यासोबत अन्य लोकं देखील दिसत आहेत. फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तापसीच्या भांगेत कुंकू कोणी लावलं…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तापसीने लग्न केलं का?’ सध्या सर्वत्र तापसीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लग्न उदयपूरमध्ये याठिकाणी झालं असून, विवाह सोहळ अत्यंत गुपित ठेवण्यात आला होता. प्री-वेडिंग कार्यक्रमांची सुरुवात 20 मार्चपासून झाली.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
तापसी पन्नू हिच्या बहिणीची सोशल मीडिया पोस्ट
अभिनेत्रीची बहीण इवानिया पन्नू हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तापसीची बहीण शहुन पन्नू, पवैल गुलाटी अन्य लोकं देखील दिसत आहेत. तापसीची खास मैत्रीण आणि लेखिका कनिका ढिल्लो हिने देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मेरे यार की शादी…’ अलं लिहिलं आहे. फोटोमध्ये अनुराग कश्यप देखील दिसत आहे.