फसवणूक आणि प्रेम कोणत्या वळणावर ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमाची कहाणी
Phir Aayi Haseen Dilruba Trailer: 'चलन से न चाल से, प्यार करने वालों को परखो उनके दिल के हाल से...', 'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमाचा दमदार ट्रेलर, तापसी पन्नू पूर्ण करणार चाहत्यांना घयाळ...
अभिनेत्री तापसी पन्नूने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण ‘हसीन दिलरुबा ‘ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ‘हसीन दिलरुबा’ सिनमेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आता ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली होती. अता सिनेमासाठी प्रेक्षकांना काही दिवस थांबावं लागणार आहे.
View this post on Instagram
हसीन दिलरुबा सिनेमाच्या दुसऱ्या भागाची रिलिज डेट आणि ट्रेलर समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमात अभिनेता विक्रांत मेसी पुन्हा तापसी हिच्या प्रेमासाठी अनेक मर्यादा ओलांडता दिसणार आहे. तर ट्रेलरमधील तापसीच्या एका डायलॉगने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘चलन से न चाल से, प्यार करने वालों को परखो उनके दिल के हाल से…’, तापसी पन्नूच्या या डायलॉगनंतर ‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमात तापसी आणखी किती पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा कधी प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत चाहते आहे.
View this post on Instagram
‘फिर आई हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे. 9 ऑगस्ट रोजी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विक्रांत मेसी आणि सनी कौशल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.