हे अत्यंत नीच.. ‘टप्पू’सोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर ‘बबिताजी’ने सोडलं मौन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बबिता आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता आणि राज अनाडकत त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

हे अत्यंत नीच.. 'टप्पू'सोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर 'बबिताजी'ने सोडलं मौन
Munmun Datta, Raj AnadkatImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 8:17 AM

मुंबई : 14 मार्च 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताजी आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता आणि राज अनाडकत यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बुधवारी संध्याकाळपासून मुनमुन आणि राज यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. वडोदरामध्ये या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांवर आता दोघांनीही मौन सोडलं आहे. या चर्चा ‘निव्वळ हास्यास्पद’ असल्याचं म्हणत मुनमुनने त्यावर संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय.

एका वेबसाइटशी बोलताना मुनमुन म्हणाली, “हे खरंच हास्यास्पद आहे. या चर्चांमध्ये कणभरही तथ्य नाही. अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात माझी ऊर्जा घालवण्यास मी नकार देते.” तर दुसरीकडे राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. ‘तुम्हा सर्वांना मी हे स्पष्ट करू इच्छितो की सोशल मीडियावर तुम्ही ज्या बातम्या पाहत आहात त्या सर्व खोट्या आणि तथ्यहीन आहेत’, असं त्यावर लिहिलं होतं.

हे सुद्धा वाचा

मुनमुन आणि राज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून आहेत. सेटवर या दोघांनी आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं मुनमुन आणि राजने याआधीही स्पष्ट केलं होतं. सध्या ‘तारक मेहता..’मध्ये मुनमुन काम करत असली तरी राजने खूप आधीच मालिका सोडली आहे. मुनमुन गेल्या 15 वर्षांपासून या मालिकेत बबिताची भूमिका साकारतेय. राज आणि मुनमुन यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे.

मुनमुनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर एका मुलाखतीत राज म्हणाला होता, “काही लोक अजूनही त्याबद्दल बोलतात. मात्र मी नेहमीच माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलंय. गॉसिप हा अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग असतो. मी माझ्या कामावर अधिक लक्ष देतो आणि अशा चर्चांकडे दुर्लक्ष करतो. माझ्या कामावरून लक्ष विचलित होईल अशा चर्चांकडे मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. मला अशा चर्चांचा त्रास होत नाही.”

यावेळी त्याने मालिका सोडण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं होतं. “हा माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात काहीच चुकीचं झालं नाही. एक अभिनेता म्हणून मला पुढे जायचं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारून मला एक कलाकार म्हणून पुढे जायचं आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी टप्पूची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी मी कायम कृतज्ञ राहीन. मात्र यापुढे मला काहीतरी वेगळं साकारायचं आहे”, असं उत्तर राजने दिलं होतं.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.