Shailesh Lodha यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर; ‘तारक मेहता…’ मालिकेनंतर घेतला मोठा निर्णय

Shailesh Lodha | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेनंतर शैलेश लोढा दिसणार 'या' वादग्रस्त शोमध्ये? मोठी अपडेट समोर... सध्या सर्वत्र शैलेश लोढा यांची चर्चा...

Shailesh Lodha यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर; 'तारक मेहता...' मालिकेनंतर घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 2:18 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अभिनेते शैलेश लोढा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चत असतात. आता देखील शैलेश एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. टीव्ही विश्वातील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून शैलेश लोढा यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेत तारक मेहता या भूमिकेत दिसणारे शैलेश आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतल्यानंतर शैलेश लोढा लवकरच अभिनेता सलमान खान याच्या वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसणार आहे. शैलेश लोढा ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

शैलेश लोढा यांच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती bigboss_17_updates नावाच्या इंस्टाग्राम पेजने दिली आहे. अशात अभिनेत्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहता येणार असल्यामुळे चाहते देखील उत्सुक आहेत. पण आतापर्यंत रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी किंवा अभिनेत्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

शैलेश लोढा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २००८ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. तब्बल १४ वर्ष शैलेश लोढा यांनी मालिकेतील तारक मेहता या भूमिकाले न्याय दिला. पण काही वाद झाल्यामुळे त्यांनी मालिकेला राम राम ठोकला. दरम्यान एका मुलाखतीत अभिनेत्याने मालिका सोडल्यानंतर भावना व्यक्त केल्या…

मालिका सोडल्यानंतर एका मुलाखतीत शैलेश लोढा म्हणाले, ‘कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता…’ पुढे अभिनेता म्हणाला, ‘भारतीय प्रचंड भावुक असतात. म्हणून फार लवकर एखाद्या गोष्टीत गुंततात… यामध्ये कोणतीही शंका नाही. मी एक भावुक व्यक्ती आहे.’ सध्या सर्वत्र शैलेश लोढा यांची चर्चा सुरु आहे.

शैलेश यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतला होता. वेळेत मानधन मिळत नसल्यामुळे शैलेश लोढा यांनी कायद्याची मदत घेतली होती. दिशा वकानी, गुरुचरण सिंह, नेहा मेहता आणि जेनिफर मिस्त्री यांनी देखील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतला आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.